Deviya rane Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: 'काजू आधारभूत दर 200 रुपये करावा'! आमदार राणेंची सूचना; नारळ उत्पादनाकडेही वेधले लक्ष

Deviya Rane: आधारभूत दर किमान २०० रुपये करावा, अतिरिक्त रकमेचा वापर शेतकऱ्यांना काजू शेतीसाठी करता येईल, अशी सूचना आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केली.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याच्या काजूला प्रोत्साहन मिळावे यासाठी गोवा काजू महोत्सव आयोजित केला जात आहे. कृषी खात्याकडून काजू उत्पादकांना आधारभूत दर १२० वरून १७० रुपये केला, तरीही तो दर कमी आहे. राज्यभरात काजूचे उत्पादन ५० टक्के कमी झाले आहे, तो आधारभूत दर किमान २०० रुपये करावा, अतिरिक्त रकमेचा वापर शेतकऱ्यांना काजू शेतीसाठी करता येईल, अशी सूचना आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केली.

गोव्याचा काजूला जीआय टॅग मिळाला आहे, त्यामुळे गोव्याच्या काजूला उच्च दर विक्रेत्यांकडून मिळायला हवा; परंतु त्यासाठी परराज्यातून येणाऱ्या काजूला आयात कर लागू केल्यास स्थानिक काजूला चांगला दर मिळेल. सध्या गोव्याच्या काजू उत्पादकांना स्पर्धेत चांगला दर मिळत नाही.

उत्तर गोव्यातील किनारी भागात काजूची भेसळ केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात आढळले आहे. त्यामुळे पर्यटन खाते आणि प्रसिद्धी खात्याने याविषयी जागृती करावी, अशी सूचनाही डॉ. राणे यांनी केली आहे.

नारळाचे आधारभूत दर १७ वरून २० रुपये करावेत; कारण त्याचे उत्पादनही कमी झालेले आहे. हेक्टरी दहा हजारांहून १५ हजार रुपये करावे. नारळ आणि काजूची लागवड का कमी झाली आहे, याची ‘आयसीएससीआर’ने एका समितीद्वारे तपासणी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT