Goa Cashew Festival 2026 Dainik Gomantak
गोवा

Cashew Festival 2026: गोवा काजू महोत्सवाची पर्वणी, पणजीत आयोजन; गोव्याच्या कृषी वारशाचा दिमाखदार उत्सव

Goa Cashew Festival 2026: काजू हा गोव्याच्या संस्कृतीचा, परंपरेचा अविभाज्य घटक असून यंदा ‘गोवा काजू महोत्सव २०२६ - पर्व ४थे’ शुक्रवार, १० ते रविवार, १२ एप्रिलपर्यंत पणजीतील दयानंद बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: काजू हा गोव्याच्या संस्कृतीचा, परंपरेचा अविभाज्य घटक असून यंदा ‘गोवा काजू महोत्सव २०२६ - पर्व ४थे’ शुक्रवार, १० ते रविवार, १२ एप्रिलपर्यंत पणजीतील दयानंद बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

काजू उत्पादक शेतकरी, फेणी व्यावसायिक यांच्या उपस्थितीत संगीत, प्रदर्शन, प्रात्यक्षिके, काजूसंबंधी चर्चासत्रे अशा विविधांगी कार्यक्रमांसहीत हा महोत्सव साजरा करण्यात येणार असून राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी केले आहे.

या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवार, १० रोजी सायं. ५ वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, वनमंत्री विश्वजीत राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, क्रीडामंत्री रमेश तवडकर, ‘जीटीडीसी’चे अध्यक्ष केदार नाईक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, ‘गोवा काजू उत्सव २०२६’ हा केवळ सांस्कृतिक सोहळा न राहता, तो काजू उद्योगातील आव्हाने आणि भविष्यातील संधींवर चर्चा करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ ठरणार आहे. गोवा वन विकास महामंडळातर्फे तीन दिवस पणजी येथील कला अकादमी येथे सकाळी १० वा.पासून विशेष चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

शुक्रवार, १० रोजी ‘जीआय टॅग आणि जागतिक ओळख’ याविषयावर पहिले चर्चासत्र होईल. या सत्राचे संचालन ॲड. केशव प्रकाश करतील तर रिचर्ड नोरोन्हा, दीपक परब, हॅन्सल वाझ आणि रोहित झांट्ये यात सहभाग घेतील.

दुसरे चर्चासत्र ‘हवामान बदल आणि काजू लागवड’ याविषयावर होणार असून या सत्राचे संचालन माजी कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो करतील तर पॅनेलमध्ये डॉ. जोस फालेरो, अमर हेबळेकर आणि संजीव जोगळेकर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT