Bicholim Former MLA Naresh Sawal  Dainik Gomantak News
गोवा

Cash For Job Scam: 'कामत, ढवळीकरांनी नोकऱ्यांसाठी कधीच पैसे घेतले नाहीत, पण...'; डिचोलीच्या माजी आमदाराने व्यक्त केली चिंता

Goa Politics: राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक सातत्याने सत्ताधारी सावंत सरकारला निशाण्यावर घेत आहेत.

Manish Jadhav

राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक सातत्याने सत्ताधारी सावंत सरकारला निशाण्यावर घेत आहेत. या प्रकरणात सावंत सरकारमधील मंत्री, आमदार सामील असल्याचा घणाघात विरोधकांकडून केला जात आहे.

यातच, सावंत सरकारमधील आमदार गणेश गावकर यांचे नाव या प्रकरणात आल्याने विरोधकांच्या टीकेला अधिक मजबूती मिळाली आहे. गावकर यांच्या विरोधात कुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी या प्रकरणाच्या तळाशी जावून मुख्यमंत्र्यांनी दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

राणे, कामत, ढवळीकरांनी नोकऱ्यांसाठी कधीच पैसे घेतले नाहीत!

दरम्यान, 2012 पर्यंत मोठ्याप्रमाणात नोकऱ्या दिल्या गेल्या पण अशाप्रकारे पैसे कुणाकडूनच घेतले गेले नाही. प्रतापसिंह राणे, विश्वजित राणे, दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर यांनी कधीच नोकरी देण्यासाठी पैसे घेतले नाही. परंतु आताची परिस्तिथी बघितली तर भविष्यकाळ डेंजर झोनमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तळाशी जाऊन मुख्य दोषींना शोधून काढणे गरजेचे असल्याचे डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

कॅश फॉर जॉब प्रकरणात पैसे घेणारे कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निक्षून सांगितले आहे. पैसे घेऊन फसवणूक केली असल्यास तक्रार करावी, आम्ही दोषींवर कठोर कारवाई करु. सोबतच दोषींची मालमत्ता जप्त करुन तक्रारदाराला त्यांचे पैसेही मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'तन्‍वी' प्रकरणाची व्याप्ती 'मोठी'! आणखी दोन तक्रारी दाखल; Social Media वरची पोस्ट चर्चेत

Rashi Bhavishya 27 November 2024: आज 'या' धनलाभ होण्याची शक्यता आहे, ती रास तुमची तर नाही ना?

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

SCROLL FOR NEXT