Panjim 
गोवा

Panaji Air Quality: पणजीत श्वास घेणं म्हणजे दिवसाला किमान दोन सिगारेट ओढणं? वाचा धक्कादायक रिपोर्ट

Goa Air Quality: गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत राज्यातील हवा प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Pramod Yadav

Panaji Air Quality

पणजी: गोव्याच्या राजधानीतील हवा प्रदूषित झाली आहे. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी एक वाजता राजधानी पणजीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३३२ एवढा नोंदवला गेला. त्यामुळे राजधानीत आता श्वास घेणे म्हणजे दिवसाला तीन सिगारेट ओढल्या सारखं झालं आहे, अशी आकडेवारीसमोर आली आहे.

वेगाने होणारे शहरीकरण यामुळे राजधानी पणजी हवा प्रदूषणाचा सामना करत आहे, असे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. राज्यातील कुडचडे आणि लोटली या भागात देखील हवेचा दर्जा निकृष्ट असल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत राज्यातील हवा प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

गोव्यातील हवेची गुणवत्ता अद्याप चिंताजनक नाहीये. पणजीतील AQI जास्त आहे. याचे कारण वाहनांमुळे होणारे प्रदूषण, बांधकाम कामे आणि हिवाळा (हवेचे कमी प्रमाण आणि हवेतील आद्रता) असल्याचे दिसून येते, अशी माहिती प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तीने पणजीत श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, असेही AQI च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीत म्हटले आहे. गोवा प्रदूषण मंडळाने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार राजधानीत ऑक्टोबर ११ ते नोव्हेंबर ११ या कालावधीत पीएम १० आणि पीएम २.५ वाढल्याचे दिसून येते. डोळ्यांना न दिसणारे हवेतील हे कण श्वास घेण्यास त्रास निर्माण करु शकतात.

वाहन आणि औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईडमुळे देखील श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. एका महिन्यात नायट्रोजनची पातळी ३२.३ वरून ३८.४ एवढी झाली आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे देखील पणजीत मोठ्या प्रमाणावर खोदकाम झाले यामुळे सर्वत्र धुळेचे साम्राज्य पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT