Cancer Screening Mission Goa Canva
गोवा

Cancer screening in Goa: कर्करोग तपासणीचा 2000 गोमंतकीयांना लाभ! राज्यात अभियानाला उत्तम प्रतिसाद

Goa cancer screening Abhiyan: गोव्यात यावर्षी कर्करोगाविरुद्धच्या लढाईत ऐतिहासिक पाऊल टाकत ‘कर्करोग तपासणी अभियान’ राज्यभर राबविण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cancer screening in Goa

पणजी: गोव्यात यावर्षी कर्करोगाविरुद्धच्या लढाईत ऐतिहासिक पाऊल टाकत ‘कर्करोग तपासणी अभियान’ राज्यभर राबविण्यात आले आहे. मंडूर, वाळपई, कुडचडे, साखळी, काणकोण, फोंडा, कुडतरी, डिचोली आणि मडकई अशा ९ प्रमुख ठिकाणी २००० हजारहून अधिक गोमंतकीयांची तपासणी करण्यात आली, सगळीकडे अभियानाला उत्तम प्रतिसाद लाभला, अशी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. आगामी काळात या मोहिमेचा विस्तार अधिकाधिक ठिकाणी करण्याचे देखील नियोजन आहे.

या तपासणीत पॅप स्मिअर, मॅमोग्राफी, पीएसए चाचणी आणि तोंडाच्या कर्करोगाच्या तपासण्या यांचा समावेश होता. याद्वारे कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होण्यास मदत झाली. निदान झालेल्या रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि गोवा डेंटल कॉलेज येथे तज्ज्ञांमार्फत पुढील उपचार मिळत आहेत.

राणे म्हणाले, २०२४ हे वर्ष गोव्याच्या महिलांच्या आरोग्यासाठी परिवर्तनकारी ठरले आहे. महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली मोबाइल कर्करोग तपासणी व्हॅन मोहीम यशस्वी ठरली. याद्वारे दारातच विनामूल्य तपासणीची सुविधा सर्वांना उपलब्ध झाली. ४.२० लाख रुपये इतके महाग असलेले पर्टुझुमॅब-ट्रॅस्टुझुमॅब थेरपी उपचार आता स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी गोवा वाद्यकीय महाविद्यालयात विनामूल्य दिले जात आहे.

२ लाख महिलांची तपासणी करणार

रॉचे हेल्थकेअर आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सुरू झालेला आय ब्रेस्ट एक्साम उपक्रम आतापर्यंत १.१ लाख महिलांपर्यंत पोहोचला आहे. पुढील वर्षी २ लाख महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ''स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा'' या दृष्टिकोनासाठी ही मोठी कामगिरी महत्वाची असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT