Dr. Rajendra Badve Dainik Gomantak
गोवा

चिंताजनक ! शहरीकरणामुळे कॅन्सरच्या रुग्णांत मोठी वाढ!

पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे: टाटा रुग्णालयाशी गोव्याचा करार; अत्याधुनिक उपचारांची होणार सोय

गोमन्तक डिजिटल टीम

Dr. Rajendra Badve वाढत्या शहरीकरणाची आम्ही किंमत मोजत आहोत. शहरीकरणामुळे कर्करोगाच्या रुग्णांत वाढ होत आहे, पण शहरीकरण अपरिहार्य आहे. वीस वर्षांपूर्वी एखादाच कोणीतरी कर्करोगग्रस्त असायचा. आता कुटुंबात एक कर्करोगग्रस्त असतो.

आम्ही ही शहरीकरणाचीच किंमत मोजत आहोत. दरम्यान, राजाश्रयाशिवाय काही होऊ शकत नाही. गोव्यात अशा कामांसाठी राजाश्रय आहे. पंतप्रधानांकडून असलेले सहकार्य तसेच मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार यामुळे गोव्यात अशा गोष्टींना राजाश्रय मिळत आहे, असे डॉ. बडवे यांनी सांगितले.

ग्रामीण भारतात कर्करोगाचे रुग्ण पाहिले, तर वार्षिक १ लाख लोकसंख्येमागे ४० ते ४५ एवढा रुग्ण दर आहे, तर उपनगरांमध्ये हे प्रमाण ६० ते ६५ रुग्ण इतके आहे. भारतातील शहरी भागांत ही संख्या एक लाखामागे १०० इतकी आहे, असेही डॉ. राजेंद्र बडवे यांनी नमूद केले.

गोव्यात सुबत्ता आहे. ग्रामीण म्हणावा असा भाग गोव्यात नाही. शहरी भागात कॅन्सरचे रुग्ण अधिक आहेत. म्हणूनच कॅन्सर प्रतिबंधक, पूर्व चाचणी, निदान आणि उपचार अशा गोष्टींच्या सुविधा देण्याची गरज आहे. गोव्यात या सुविधा असाव्यात, असेही ते म्हणाले.

कर्करोग टाळण्याची दशसूत्री

  • दहाव्या वर्षी आईचे बोट सोडावे.

  • विसाव्या वर्षी खेळण्यांशी खेळणे सोडावे

  • तिसाव्या वर्षी इकडे तिकडे बघणे बंद करावे

  • चाळिसाव्या वर्षी संध्याकाळचे जेवण बंद करावे

  • पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाणे बंद करावे.

  • साठाव्या वर्षी नवीन काही सुरू करायचे नाही, आहे तेच चालू ठेवावे.

  • सत्तराव्या वर्षी आंबट खाणे बंद करावे

  • ऐंशीनंतर ‘हार्ड बेड’वर झोपावे

  • नव्वदाव्या वर्षी आयुष्याची आसक्ती सोडावी

  • शंभर वर्षांपर्यंत आयुष्य जगावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT