Canacona News Dainik Gomantak
गोवा

Canacona News: 'असा' पार पडला मल्लिकार्जुन देवस्थानाचा वार्षिक समुद्रस्नान सोहळा; भाविकांनी अनुभवली पारंपारिक उत्सवाची धूम

Canacona News: संपूर्ण गोव्यासहित कारवार भागातील लोक श्रींच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरता याठिकाणी आवर्जून भेट देतात.

Ganeshprasad Gogate

Canacona News: श्रीस्थळ, काणकोण‌ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या सुप्रसिद्ध समुद्र स्नानासाठी आज दि. 10 रोजी, राजबाग, तारीर येथील देवावेळ या ठिकाणी भक्तांचा पूर लोटला होता. पारंपारिक ठिकाणी पालखीच्या बसका घेण्यात आल्या.

यावेळी भक्तांकडून श्रींची पूजा करण्यात आली. देवावेळ याठिकाणच्या समुद्र स्नानानंतर पालखी मुख्य देवस्थानात दुपारी पोहचली. धार्मिक विधीनंतर या सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

महाशिवरात्री निमित्त देवस्थानात दि.8 रोजी वांगडी, महाजन व भक्तगणांकडून महाअभिषेक, महाआरती, आदी विधी संपन्न झाले. संध्याकाळी 8 वा.अन्य विधी झाल्यावर श्रींची देवस्थान परिसरात रथातून मिरवणूक काढण्यात आली. तद्नंतर मुख्य देवालयात श्रींची पुजा, आरती आणि महाप्रसाद वितरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली होती.

आज रविवार 10 मार्च रोजी पारंपारिक विधी नंतर पहाटे 5 वा. श्रींनी राजबाग तारीर या ठिकाणी वार्षिक समुद्र स्नानाकरिता वांगडी, महाजन, कुळावी,भक्तगण व पारंपारिक वाद्यवृंदासह प्रयाण केले.

देवावेळला जत्रोत्सवाचे रुप:-

देवावेळ या ठिकाणी या निमित्ताने मोठी जत्रा भरते. संपूर्ण रस्ता साफसफाई, रांगोळी रेखाटून ल तोरणें बांधून सजविलेली असते. लहानापासून थ़ोराकरता वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सजविलेली असतात.

या निमित्ताने कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असते. संपूर्ण गोव्यासहित कारवार भागातील लोक श्रींच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरता आणि खरेदी करता याठिकाणी आवर्जून भेट देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT