Goa News | Mallikarjun Devalaya Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यातील श्री मल्लिकार्जुन देवालय जमीन आरक्षित!

Goa News: भविष्यात देवालय जमिनीवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी जागा आरक्षित केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध करण्यासंदर्भात देवालयाच्या महाजनांनी 31 जुलैच्या आमसभेत ठराव घेतला होता. त्याची कार्यवाही सध्या सुरु आहे, अशी माहिती देवालय समितीचे अध्यक्ष विठोबा देसाई यांनी दिली.

दरम्यान, त्याच कार्यवाहीचा एक भाग म्हणून पाळोळे येथील देवालय मालकीच्या 7500 चौ. मीटर जमिनीपैकी अतिक्रमण करून राहिलेली जमीन भविष्य काळातील अतिक्रमणे रोखण्यासाठी राखून ठेवण्यात येत आहे. भविष्यात देवालय जमिनीवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी जागा आरक्षित केली असून देवालयाच्या सर्व महाजनांची पाठिंबा व समंती असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मोकळ्या जागा ताब्यात घेणे सुरू !

भाटपाल, मोखर्ड व पाळोळे येथे देवालय मालकीची बागायती जमिनी होत्या. त्या जमिनीत ही देवालय समितीने लागवड केली आहे. देवालय मालकीच्या जमिनीवर येथील काही रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. भविष्यात अशा अतिक्रमणांना चाप बसावा यासाठी राहिलेल्या मोकळ्या जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे विठोबा देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

SCROLL FOR NEXT