Goa Biodiversity Conservation  Dainik Gomantak
गोवा

Goa News: जैवविविधता समितीसाठी आयोजित ग्रामसभा तहकूब

Goa News: श्रीस्थळ पंचायत : समितीसाठी मंडळाला अधिकार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: श्रीस्थळ पंचायतीची जैवविविधता व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी बोलावलेली ग्रामसभा पंचायत मंडळाला गदारोळामुळे दुसऱ्यांदा तहकुब करावी लागली. मात्र, तत्पूर्वी यापुढे जैवविविधता समिती नियुक्तीसाठी सरपंच व पंचायत मंडळाला अधिकार देण्यासंबंधी ठराव संमत करण्यात आला.

23 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत जैवविविधता समिती निवडीवेळी दोन गट पडून प्रकरण हातघाईवर आल्याने पंचायत सचिवांनी ग्रामसभा तहकुब केली होती. पंचायत सभागृहात ती तहकुब केलेली ग्रामसभा पुन्हा बोलाविण्यात आली. त्यावेळी जैवविविधता समितीत राहण्यास इच्छूक असलेल्या अकरा उमेदवारांनी आपली नावे दिली.

मात्र, त्यांना कोणीच अनुमोदन दिले नाही. त्यामुळे ग्रामसभेत मोठा गोंधळ होऊन प्रकरण हातघाईवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन सरपंच सेजल गावकर यांनी ग्रामसभा तहकुब केल्याची घोषणा केली. मात्र, त्यापूर्वी यापुढे जैवविविधता समिती नियुक्त करण्यासाठी सरपंच व पंचायत मंडळाला अधिकार देण्यासंबंधी ठराव संमत करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT