CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Canacona News: काणकोणचा कायापालट होणार, नगराध्यक्षांच्या 'त्या' निवेदनाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी

पालिकेकडून कृतज्ञता: सभापतींंचे प्रयत्न यशस्वी

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News: काणकोण शहरातील विकास अत्यावश्यक असल्यामुळे चार-रस्ता ते काणकोण पोलिस स्टेशनपर्यंतचे पथदीप खांब बदलणे, जीर्ण पदपथ व अरुंद रस्ता यासंबंधी उपाययोजना करण्याच्या दिलेल्या निवेदनाला मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी 8 रोजी मंजुरी दिली असल्याने नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी मुख्यमंत्री व सभापतींना धन्यवाद दिले आहेत.

यासंबंधीचा प्रस्ताव सभापती तवडकर यांच्या वाढदिवसानंतर सभापती तवडकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला होता.

यावेळी नगराध्यक्ष नाईक गावकर, उपनगराध्यक्ष नादीन फर्नांडिस, नगरसेवक सायमन रिबेलो, लक्ष्मण पागी, भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, जीसीएचे उपाध्यक्ष शांबा नाईक देसाई आदी उपस्थित होते.

काणकोणात नवीन रवींद्र भवनची वास्तू सज्ज होत असताना तेथील भागाचे सौंदर्यीकरण व्हायला हवे या उद्देशाने काणकोण पालिका मंडळाने मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांची भेट घेऊन शहराच्या विकासाची मागणी केली, त्याला काल संध्याकाळी मंजुरी दिली असल्याचे पत्र सभापती कार्यालयाला प्राप्त झाले.

या प्रस्तावांतर्गत चार-रस्ता ते काणकोण पोलिस स्थानकापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण, पदपथ, नवीन पथदीप खांब, अत्याधुनिक पथदीप, सौंदर्यीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी मुख्यमंत्री, सभापती व आमदार तवडकर यांना धन्यवाद दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT