Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोधले 51 मोबाईल फोन; कळंगुट PI नी केलंय 'हे' आवाहन

Calangute Crime कळंगुट, बागा सारख्या किनारी भागात पर्यटकांच्या वस्तूंची चोरी होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती

Ganeshprasad Gogate

Police Have Seized High Quality Mobile Phones Using Modern Technology गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या साहित्यांची, मोबाईल, लॅपटॉप सारख्या गॅझेटची चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत असून मानवी सहकार्याने पोलिसांना काही प्रकरणांचा छडा लावण्यात यश आलंय.

मात्र आता पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीच्या घटनांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून त्यात त्यांना पुरेपूर यश देखील आलंय.

नुकतंच कळंगुट पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान CEIR पोर्टलचा वापर करून गेल्या 3 महिन्यांत उच्च दर्जाचे 51 मोबाईल फोन ट्रॅक केल्याची बातमी हाती येतेय.

कळंगुट, बागा सारख्या किनारी भागात पर्यटकांच्या वस्तूंची चोरी होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती.

कळंगुट पोलीस स्टेशनच्या हद्दीतसुद्धा पर्यटकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. कळंगुट पोलिसांनी CEIR पोर्टलचा वापर करून विविध ब्रँडचे असे 51 मोबाईल फोन शोधून काढले आहेत.

यात प्रामुख्याने वन प्लस आणि सॅमसंग या कंपनीच्या मोबाईल फोनची संख्या जास्त होती. जप्त करण्यात आलेल्या फोन्सची एकूण रक्कम अंदाजे 13 लाख आहे.

जप्त केलेले फोन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालकाला सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान कळंगुट पोलीस स्टेशनचे पीआय परेश नाईक यांनी कळंगुट येथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या वस्तू व मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन देखील केलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT