भटकी कुत्री  Dainik Gomantak
गोवा

Goa: भटक्या कुत्र्यांच्या निर्जंतुकीकरणात कलंगुट पंचायत अग्रेसर

डिचोलीमधील गोमंतक गोसेक महासंघाने पशुशाळा उभी केली आहे. तेथे भटक्या जनावरांना ठेवण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील (Goa) सुमारे २० नागरी संस्थांनी भटक्या कुत्र्यांची (stray dogs) संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाशी करार केला आहे. त्यामध्ये कलंगुट पंचायतीने (Calangute Panchayat) आपल्या भागातील २ हजार कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे.

जनावरांच्या देखभाल आणि निवाऱ्यासह कलंगुटमध्ये नोहा संस्थेसोबात सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मदतीने या भागातील किनारपट्टी लगत सर्व कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यामुळे खेड्यातील कुत्र्यांच्या पिल्लांमध्ये घट झाली आहे.

त्याचबरोबर मिशन रेबीज अंतर्गत गावात अँटी रेबीज डॉग लसीकरण सुरु करण्यात आले आहे. कलंगुटमध्ये अंदाजे २५०० भटक्या कुत्री आहेत, यातील ५०० ते ६०० कुत्री अरपोरा आणि कंडोलिम परिसरात जातात. या गोव्याच्या किनारपट्टी भागात पर्यटकांची भरपूर गर्दी असते. त्यामुळे या भागाच वाहनांची सारखी ये-जा असते या वाहनांना धडकून अनेक जनावरांचे मृत्यू होतात.

डिचोलीमधील गोमंतक गोसेक महासंघाने पशुशाळा उभी केली आहे. तेथे भटक्या जनावरांना ठेवण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे. मागील वर्षी २०० भटक्या जनावरांना पशुशाळेत आणण्यात आले होते. पंचायत भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि त्यांच्यामुळे होणारे अपघात, उपद्रव याची संख्या कमी करण्याचा करीत प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात या प्रकरणात घट होईल असे मार्टिन्स यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT