Goa Narcotic Raid Dainik Gomantak
गोवा

Goa Narcotic Raid: सनबर्न महोत्सवापूर्वी गांजा तस्करीवर पोलिसांची कारवाई; 94 हजार रुपयांचा माल जप्त

Goa Narcotic Raid: सनबर्न महोत्सवात अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत

Ganeshprasad Gogate

Goa Narcotic Raid: डोंगरपूर जंक्शन, नायकवाडो, कळंगुट येथे पोलिसांनी केलेल्या छापेमारीत तब्बल 90 हजाराहून जास्त रकमेचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कळंगुट पीआय योगेश कोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्रौच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून छफेर अली (वय 35 वर्ष, रा. हणजूण) असे संशयित आरोपीचे नाव असून अधिक चौकशीसाठी त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी छफेर अली कडून 940 ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा) जप्त केला असून याची बाजार किंमत अंदाजे रु. 94,000/- असल्याची माहिती मिळतेय.

सध्या गोव्यात सनबर्नची धूम सुरु असून 31st सेलिब्रेट करण्यासाठी देश विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव गोवा पोलिसांची करडी नजर या सर्व इव्हेंटवर असणार आहे. सनबर्न महोत्सवात अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. यात डॉग स्क्वॉडसह पोलिसांच्या खास पथकाचा समावेश आहे.

गोव्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असून याच काळात बऱ्याचदा अमली पदार्थांची तस्करी होताना दिसून आली आहे.

नवीन वर्ष आणि सनबर्न फेस्टिव्हल दरम्यान अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी काही विशेष पथके तयार केली असून यात स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी सेल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम कार्यरत आल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT