Goa Crime Dainik Gomantak
गोवा

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर, पोलिसांच्या कळंगुट- बागा परिसरात धाडी

सर्व आरोपींवर बाल न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय

Ganeshprasad Gogate

Goa Crime: गोव्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून अशा घटनांमध्ये परप्रांतीयांचा हात असल्याचे वारंवार सिद्ध होतंय. कळंगुट आणि बागा किनाऱ्यावर लहान मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धाड टाकली. चाइल्ड लाईन संस्थेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हि मोहीम यशस्वीरीत्या राबवली.

या संबंधी मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार भीमा काळे आणि त्यांच्या पत्नी मीरा काळे, सकुबाई काळे, चंपा शिंदे, सुरेश अशोक काळे, अनिता आब्बा काळे, पूजा अविनाश काळे, धनाजी पवार आशाबाई पवार (सर्व राहणार, मूळ उस्मानाबाद- महाराष्ट्र) यांनी अल्पवयीन मुलांचा वापर करून किनाऱ्यांवर भीक मागण्याचे प्रकार सुरु केले होते.

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर चाइल्ड लाइनच्या सदस्या मायरा फर्नांडिस यांनी कळंगुट पोलिसात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान या घृणास्पद प्रकाराविरोधात पोलिसांनी कळंगुट आणि बागा किनारी परिसरात फिरणाऱ्या वरील सर्व आरोपींवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा 2015 च्या कलम 11, कलम 76 अन्वये शिक्षापात्र गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT