Speaker Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: 15 दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदलाचा फैसला; कामत, आमोणकर, लोबोंना लॉटरी लागणार? सभापतींना दिली महत्वाची माहिती

Goa Cabinet Reshuffle Latest Updates: येत्या 15 दिवसांत राजकीय धूळवड साजरी होणार हे आता गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी केलेल्या वक्तव्याने नक्की झाले आहे.

Manish Jadhav

Goa Cabinet Reshuffle To Be Resolved In 15 Days Says Speaker Ramesh Tawadkar

राज्यात सध्या धूलिवंदानाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पण येत्या 15 दिवसांत राजकीय धूळवड साजरी होणार हे आता गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी केलेल्या वक्तव्याने नक्की झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सावंत सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण सभापती तवडकरांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. एवढेच नाहीतर तवडकरांनी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते याची शक्यताही वर्तवली. त्यांनी काही राजकीय नेत्यांची नावे घेऊन स्पष्ट संकेत दिले.

सभापती तवडकर काय म्हणाले?

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आज (14 मार्च) धूलिवंदनानिमित्त आपल्याच मतदारसंघातील बारशे गावाच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. तवडकर म्हणाले की, ''येत्या 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तारावर फैसला होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. पण निलेश काब्राल, दिंगबर कामत (Digambar Kamat), मायकल लोबो, दिलायला लोबो आणि संकल्प अमोणकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे.''

भाजचे राष्ट्रीय सरचिटणीस यांचा गोवा दौरा

भाजचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष 4 मार्च रोजी गोवा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. पण ते अखिल भारतीय महिला मोर्चा संमेलनाच्या तयारीचा आढावा घेऊन निघून गेले.

यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा झाली का याबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना विचारण्यात आले होते. तेव्हा राणे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावर भाष्य करणे टाळत, मी फक्त चहा घेण्यासाठी आलो होतो, असे उत्तर दिले होते. एवढेच नव्हे तर मी एक सामान्य आमदार आहे, असेही राणे म्हणाले होते. तर दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा निराधार आहेत असे म्हणत बी. एल. संतोष संघटनात्मक बैठक घेण्यासाठी गोव्यात आले असल्याचे सांगितले होते.

राजकीय चर्चांना उधाण

सभापती तवडकरांनी मंत्रिमंडळ विस्तारावर केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांची धाकधूक पुन्हा एकदा वाढली असून ज्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटणार हे मात्र नक्की. तवडकर यांच्या वक्तव्यानंतर राजकीय तज्ञ अनेक तर्क-वितर्क लढवू लागले आहेत. त्यामुळे आता येत्या 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तारावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो हे नक्की झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT