joshua de souza and ramesh tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: सभापतींच्या नावाच्या चर्चेनंतर आता उपसभापतीही 'इन्टरेस्टेट', मंत्रिमंडळ फेरबदल चर्चेत आणखी एक ट्विस्ट

Goa Cabinet Reshuffle: गोवा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आल्याने तशा राजकीय हालचाली देखील होताना दिसत आहेत.

Pramod Yadav

Goa Cabinet Reshuffle

पणजी: गोवा मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहेत. अनेक नेत्यांसह सभापती रमेश तवडकर देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असताना यात आणखी एक नाव पुढे आले आहे. विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी त्यांना मंत्रिपदाची ऑफर मिळण्यास ती स्विकारण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी नुकतेच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत दिले आहेत. नव्या वर्षात लवकरच बदल होण्याची शक्यता त्यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली. फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आल्याने तशा राजकीय हालचाली देखील होताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिपद देण्याबाबत चर्चा समोर येत होत्या. त्यानंतर आता म्हापसा आमदार जोशुआ डिसोझा यांनी देखील त्यांना मंत्रिपद देण्याबाबत राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडून प्रस्ताव आल्यास तो स्विकारणार असे म्हणाले आहेत.

मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. दोनदा आमदार झालो. पक्षातून माझे नाव वरती गेले, केंद्रातून देखील त्याला समर्थन मिळाले तर मी मंत्रिपदाची ऑफर स्विकारण्यास तयार आहे. म्हापशाच्या विकासाठी तसेच संपूर्ण गोव्यासाठी मी मंत्रिपद घेईन. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवल्यास मी तयार आहे असे
जोशुआ डिसोझा, आमदार (म्हापसा)

दरम्यान, संभाव्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा आहे. पण, यात आत्तापर्यंत जोशुआ यांचे नाव समोर आले नव्हते. पण, त्यांनी स्वत: तसा प्रस्ताव आल्यास आपण तयार असल्याचे भाष्य केल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. यापूर्वी सभापती रमेश तवडकर यांचे देखील नाव समोर आले होते.

प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्या वक्तव्याने फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले खरे पण फेरबदल केव्हा होणार याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे मात्र इच्छुकांची यादी वाढत जात असल्याचे चित्र आहे. असे असले तरी अखेरचा निर्णय राज्य आणि केंद्रातील वरिष्ठ नेतेच घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

SCROLL FOR NEXT