Goa CM Pramod Sawant Delhi Visit Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: गोवा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग? 3 आमदार एका मंत्र्यासह CM सावंत दिल्लीत दाखल

Goa CM Pramod Sawant cabinet reshuffle: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची दिल्लीतील उपस्थिती देखील महत्त्वाची मानली जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Cabinet Reshuffle

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जैसलमेरमार्गे दिल्लीला रवाना झाले असून त्यांच्यासोबत आमदार प्रेमेंद्र शेट, दाजी साळकर आणि जीत आरोलकर आहेत. त्याचबरोबर पर्यटनमंत्री रोहन खंवटे देखील दिल्लीत दाखल झाल्याचे समजते. या हालचालींमुळे राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होण्याच्या शक्यतेच्या चर्चेला उधाण आले आहे.

दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, दिल्लीतील नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ही भेट मंत्रिमंडळातील बदलांशी संबंधित असू शकते. सध्या गोव्यातील भाजप सरकारमध्ये काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त होत आहे, तसेच आगामी जिल्हा पंचायत, पालिका निवडणुका आणि राज्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता, हा फेरबदल अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची दिल्लीतील उपस्थिती देखील महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या खात्यातील कामगिरीबाबत चर्चेत असलेली कौतुकाची भूमिका यासाठी निर्णायक ठरू शकते.

नव्या चेहऱ्यांना संधी?

मुख्यमंत्री सावंत यांच्या दिल्ली दौऱ्यात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, तर काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात.

खर्च कुणी केला?

मुख्यमंत्री व आमदारांच्या चार्टर उड्डाणाचे फोटो व्हायरल होताच विरोधकांनी खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तिजोरीवर ३४ हजार कोटींचे कर्ज आहे. सामाजिक योजनांचे पैसे वेळेत जमा होत नाहीत. जैसलमेरच्या चार्टरसाठी किमान ११ ते १२ लाख खर्च आहेच. तो कुणी केला हे जाहीर करा, असे आप नेते अमित पालेकर, काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT