CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet 2026: 'म्हजे घर' योजनेसाठी जमीन महसूल कायद्यात बदल, फोंडा पोटनिवडणुकीनंतर रिक्त मंत्रिपद भरणार; मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टच सांगितलं

Goa Cabinet Decisions 2026: गोवा मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय जाहीर

Manish Jadhav

पणजी: गोवा मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने गृहनिर्माण, शेती आणि राजकीय फेरबदलांचे संकेत देण्यात आले. सरकारने 'म्हजे घर' (Mhaje Ghar Scheme) ही महत्त्वाकांक्षी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी 'गोवा जमीन महसूल संहिता अध्यादेश 2026' ला मंजुरी दिली. या अध्यादेशामुळे सर्वसामान्य गोवेकरांना स्वतःचे घर बांधताना येणारे कायदेशीर अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

तसेच, पशुपालकांसाठीही एक मोठा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाकडून (MAIDC) पशुखाद्य खरेदी करण्यास मंत्रिमंडळाने संमती दिली. यामुळे राज्यातील दुग्धव्यवसायाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. जमिनीच्या रुपांतराबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, नगर आणि ग्रामनियोजन (TCP) कायद्याच्या कलम 39-ए अंतर्गत होणारे जमिनीचे रुपांतर साखळी मतदारसंघात प्रभावी ठरणार नाही. यासंदर्भात त्यांनी टीसीपी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याचेही नमूद केले.

एवढचं नाहीतर राजकीय आघाडीवरही मुख्यमंत्र्यांनी मोठे भाष्य केले. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप 100 टक्के विजय मिळवेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिमंडळात रिक्त असलेले एक मंत्रीपद भरले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे फोंडा निवडणुकीनंतर गोव्याच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्याची वर्णी लागणार असल्याचे आता निश्चित झाले असून सत्ताधारी गोटात हालचालींना वेग आला आहे.

राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला मोठा दिलासा दिला. "गोव्यात (Goa) पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही," असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. राज्याकडे सध्या पुढील आठ दिवसांचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सातत्याने सुरु राहील याची खबरदारी सरकार घेत आहे. इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारशी समन्वय सुरु असून येत्या आठ दिवसांत उर्वरित सर्व तांत्रिक प्रश्न सुटतील, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे किंवा साठेबाजी करण्याचे कारण नसल्याचे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT