Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Elections: पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव; कामगिरी सुधारण्‍याचं आव्‍हान

Harvalem Panchayat Elections: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रतिनिधित्व करीत असलेल्या साखळी विधानसभा मतदारसंघातील हरवळे पंचायतीच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री समर्थक सर्व उमेदवार निवडून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रतिनिधित्व करीत असलेल्या साखळी विधानसभा मतदारसंघातील हरवळे पंचायतीच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री समर्थक सर्व उमेदवार निवडून आले.

केपे मतदारसंघातील मोरपिर्ला पंचायतीच्या एका प्रभागात माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर समर्थक निवडून आल्याने भाजप नेतृत्वासमोर काँग्रेस नेतृत्व प्रभावहीन ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

‘गोमन्तक’ने ९ जून २०२४ रोजी ‘सरकारनामा’ सदरात ‘लोकसभा निकालावरून काँग्रेस नेतृत्व प्रभावहीन’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या विश्लेषणातील मुद्दे आजही तसेच असून ऑक्टोबरातील पंचायत निवडणूक निकालाने काँग्रेस नेतृत्व आपल्या कमकुवतपणावर मात करू शकले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

हरवळेत मुख्यमंत्र्यांचे समर्थक पाचही प्रभागांतून निवडून आले व त्यात प्रभाग एकमधील उमेदवार देमगो मळीक हे बिनविरोध निवडले गेले. मागील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना ‘काँटे की टक्कर’ देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाकडे सदर प्रभागात उमेदवारच असू नये, हे राजकीयदृष्ट्या बरोबर नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दक्षिण गोव्यात सध्या काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा प्रतिनिधित्व करीत असलेल्या केपे मतदारसंघातील मोरपिर्ला पंचायतीच्या प्रभाग ६मध्ये माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा समर्थक सोनू वेळीप हे ९३ मतांच्या आघाडीने निवडून येणे म्हणजे सदर मतदारसंघात काँग्रेसचे मताधिक्य कमी होत असल्याचेच द्योतक आहे.

मागच्या पंचायत निवडणुकीत सदर उमेदवाराची आघाडी फक्त ९ होती, ती आता ८४ मतांनी वाढली आहे. एकंदर पंचायत पोटनिवडणूक निकालांवरून कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, गोव्यात होणाऱ्या आगामी जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकांची तयारी आतापासूनच गंभीरतेने करण्याची गरज आहे. त्‍यासाठी रणनीती ठरवावी लागेल.

मुद्दाम मागून घेतली होती जबाबदारी

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्याचे समन्वयक म्हणून एल्टन डिकोस्टा यांची दिल्लीवरून नेमणूक झाली होती. दक्षिण गोव्याचे समन्वयक म्हणून ॲड. कार्लुस फेरेरा यांना हायकंमाडने नेमल्यानंतर सदर जबाबदारी स्वीकारून आपण काम सुरू केल्याचे ॲड. फेरेरा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले; परंतु केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी हायकमांडशी बोलून दक्षिण गोव्याचे समन्वयक म्हणून नेमणूक करून घेतली व कार्लुसना उत्तरेत पाठविले. परंतु, अदलाबदल करूनही काँग्रेसला हवे तसे यश ते आपल्या केपे मतदारसंघातही देऊ शकले नव्हते.

प्रभारींच्या उपस्थितीत आले निकाल

प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर या पाच दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असतानाच पंचायतीच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाच्या कर्तुत्वाबद्दल त्यांनाही कळून चुकले असेल, असे राजकीय विश्लेषक म्हणतात.

निकालाची योग्य दखल घेत स्थानिक नेतृत्वाला आळस झाडून कामाला लावल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे जाणकार म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: तीन वर्षांत चार जणांचे बळी; तोणीर धबधब्याबाबत वाळपई पोलीस सतर्क

Mershi Murder Case: मेरशी खूनप्रकरणातील संशयिताला हायकोर्टाकडून सशर्त जामीन

Goa Panchayat Police Complaint: काणकोण तालुक्यात संशयित हालचाली, दोन युवक कराताहेत प्रत्येक घराचे चित्रिकारण

Fraud Alert: सावधान! फसवणूक करणाऱ्यांकडून नेत्यांच्या नावांचा गैरवापर; व्हॉट्सॲपला बनवलं हत्यार

55th Iffi Festival In Goa: इफ्फीत ऑस्ट्रेलियाला “कंट्री ऑफ फोकस” नामांकन; सिनेरसिकांना होणार ऑस्ट्रेलियन चित्रपटांच्या जागतिक योगदानाची ओळख!

SCROLL FOR NEXT