Goa Coconut Price Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut Price: गणेशोत्सवात नारळ महागला, पण ग्राहकांना मिळणार स्वस्तात! 70 हजार नारळांची खरेदी; राज्यभरातील 17 केंद्रांवर 38 रुपयांत विक्री

Goa Coconut Sale 38 Rupees: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नारळांच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाने तब्बल ७० हजार नारळांची खरेदी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नारळांच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाने तब्बल ७० हजार नारळांची खरेदी केली आहे. हे नारळ गुरुवारपासून अनुदानित दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या खुल्या बाजारात नारळाचे दर ६० ते ७० रुपये प्रतिनग इतके आहेत. मात्र, महामंडळाकडून ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर प्रतिनारळ ३८ रुपये दराने विक्री केली जाणार आहे. ९ सप्टेंबरपासून गणेशचतुर्थीच्या अकराव्या दिवसापर्यंत ही विक्री सुरू राहणार आहे.

राज्यभरातील महामंडळाच्या १७ केंद्रांवर, फलोत्पादन खात्याच्या दुकानांमध्ये तसेच अधिकृत विक्रेत्यांमार्फत नारळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. चतुर्थीच्या काळात मागणी वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत कमी दरात नारळ मिळावा, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT