Goa Budget Session 2024 | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

PM मोदी गोव्यात येणार त्या दिवशी अधिवेशन कामकाज बंद, अर्थसंकल्प केव्हा सादर होणार?

रद्द करण्यात आलेले कामकाज एक दिवस पुढे ढकलण्यात आले असून, 10 फेब्रुवारी रोजी हे कामकाज होईल

Pramod Yadav

Goa Budget Session 2024: गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 02 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. राज्यपालांच्या भाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. अधिवेशन काळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येत असल्याने या दिवशी अधिवेशन कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती बीएसीच्या बैठकीनंतर विजय सरदेसाई यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 06 फेब्रुवारी रोजी विधानसभेतील अधिवेशन कामकाज बंद राहणार आहे. रद्द करण्यात आलेले कामकाज एक दिवस पुढे ढकलण्यात आले असून, 10 फेब्रुवारी रोजी हे कामकाज होईल, असे बीएसी बैठकीनंतर सरदेसाई म्हणाले.

गोव्याचा 2024-25 वर्षाचा अर्थसंकल्प 08 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार, असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज झाली असून, बेरोजगारी, पणजी स्मार्ट सिटी, फिल्म सिटी, म्हादई यासारख्या विषयावरुन घेरण्याची शक्यता आहे.

अस्मिता दिवस राज्य पातळीवर साजरा केला जावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई यांनी अस्मिता दिन आणि खासगी क्षेत्रात गोमन्तकीय भूमीपुत्रांना 80 टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी करणारे खासगी विधेयक सादर केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT