Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa News: ...पाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यात भांडण होईल, युरी आलेमाव भडकले; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर घडामोडी

Akshata Chhatre

...पाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यात भांडण होईल, युरी आलेमाव भडकले

म्हादईचे पाणी वळवल्यामुळे पाण्यासाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात भांडण होईल. प्रवाह समिती स्थापन करुन काहीच फायदा नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली. सावंत सरकार यासंबंधी केंद्र सरकार जे काही सांगते त्याआधारावर निर्णय घेते, असा घणाघात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला

'तपशीलवार रिपोर्ट द्या'; कुलगुरुंच्या आरोपांची राज्यपालांनी घेतली दखल!

गोवा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अलिकडेच विद्यापीठावर गंभीर आरोप केले होते. आता राज्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी या आरोपांबाबत तपशीलवार अहवाल मागितला आहे.

अक्षयपात्रच्या अत्याधुनिक किचनचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले उद्घाटन

अक्षयपात्रच्या अत्याधुनिक किचनचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उद्घाटन केले. अक्षयपात्रचा आहार शाळांसोबत तुरुंग आणि सरकारी इस्पितळांतही देण्याचा विचार आहे. माध्यान्ह आहाराचे कंत्राट अक्षयपात्रला दिले असले तरी स्वयंसहाय्य गट बंद करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Goa Crime: कुंपणच खाते शेत, गोव्याच्या अबकारी निरिक्षकाला कर्नाटकात अटक

उत्तर कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातील एका गावात गोव्यातून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या गोवा अबकारी खात्याचे निरिक्षक प्रमोद जुवेकरला कर्नाटक पोलिसांकडून रविवारी अटक.

Goa Accident: शिवोली हाऊसिंग बोर्ड स्लोप येथे अपघात

शिवोली हाऊसिंग बोर्ड स्लोपवर एका वॅगनआरने नियंत्रण गमावले आणि अशोक लेलँड मालवाहू गाडी, एक टेम्पो रिक्षा आणि एक इनोव्हा यांना धडक दिली. कोणतीही दुखापत झाली नसली तरी, तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी झाली आहे. अधिकारी घटनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत.

Goa University: महिला विद्यार्थिनीला परीक्षेचा पेपर देणाऱ्या प्राध्यापकाचे निलंबन

गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थिनीला परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उघड केल्याबद्दल प्राध्यापकांना निलंबित केले.

Goa University Paper leak: लव्ह फॉर पेपर घोटाळ्याप्रकरणी कारवाईची मागणी

गोवा फॉरवर्ड स्टुडंट्स सेलचे सदस्य हृतिक मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन गोवा विद्यापीठातील लव्ह फॉर पेपर घोटाळ्याप्रकरणी कारवाईची मागणी केली. या प्रकरणात कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे हृतिक मांद्रेकर म्हणाले.

Goa Mining: मुळगाव खाणप्रश्नी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक

मुळगाव खाणप्रश्नी मंगळवारी १८ मार्च रोजी पणजीत होणार महत्वाची बैठक. सायंकाळी ५ वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात होणार संयुक्त बैठक. गेल्या गुरुवारी १३ मार्च रोजी ऐनवेळी बैठक करण्यात आली होती रद्द.

Goa Congress: काँग्रेसचे एल्टन भाजपमय?

''राज्यात भाजप सरकार आहे. मी काही म्हणत नाही.सर मला शोधत होते. भविष्यातील मग बघूया. विरोधात असताना इतकी कामे होत असतील तर सत्तेत असतो तर किती झाली असती तुम्हीच पहा''. केपे मतदारसंघातील बेतूल पंचायतीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टाचे मुख्यमंत्र्यांसमोर वक्तव्य.

Shiv Jayanti Goa: डिचोलीत शिवजयंतीचा उत्साह

डिचोलीत शिवजयंतीचा उत्साह. छत्रपती शिवरायांचे पुजन करून शिवजयंती उत्साहात साजरी.

Goa University: प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेमुळे ABVPचा संताप; 11वाजता करणार आंदोलन

गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेमुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) गोवा युनिट संतापले आहे. जबाबदार प्राध्यापक आणि इतरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ते सोमवार (दि.१७) रोजी आंदोलन करणार आहेत.

Manohar Parrikar Death Anniversary: माजी रक्षा मंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT