राजधानी पणजी आणि आसपासच्या परिसरात वीज खांबांचा अनधिकृत वापर करून फायबर आणि टेलिकॉम केबल्स टाकणाऱ्या दोन बड्या कंपन्यांविरुद्ध वीज खात्याने कठोर पावले उचलली आहेत. वीज खात्याच्या अधिकृत परवानगीशिवाय आणि नियमांचे उल्लंघन करून केबल्सचे जाळे पसरवल्याप्रकरणी पणजी पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
गोव्यातील पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या सत्तरी तालुक्यातील केरी येथील एका मोठ्या हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. 'गोवन स्पाईज' या हॉटेलमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने हॉटेल व्यवस्थापनाला कडक शब्दांत ताकीद देत पुढील १५ दिवसांत सर्व व्यवस्था सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.
सत्तरी येथील होंडा येथील आयडीसी जंक्शनजवळील नवनाथ मंदिरात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मंदिराची दानपेटी तोडण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील युवकांपुढे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही, माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी या संधींपासून दूर राहत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही खंत व्यक्त केली. गोव्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित आहेत, मात्र अनेक तरुणांना याबद्दल साधी कल्पनाही नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.
गोव्यातील अंतर्गत रस्त्यांवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. कुडचडे येथील शेळवण भागात एका भरधाव डंपर आणि चारचाकी कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.
म्हापसा येथील जेएमएफसी न्यायालयाने अजय गुप्ता यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. व्यापार परवाने मिळवण्यासाठी बनावट आरोग्य प्रमाणपत्रांचा वापर करून केलेल्या कथित फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली गुप्ता यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर गोव्यातील ४२ कंपन्या आणि २७ रेस्टॉरंट्स व हॉटेल्सना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आणि काळ्या काचा वापरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर, प्रशासनानं आता कृती आराखडा तयार केला आहे. या आदेशाला अनुसरून फातोर्डा वाहतूक विभागानं विशेष मोहीम राबवत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना चांगलाच दणका दिला.
बर्च आग प्रकरण: म्हापसा जेएमएफसी न्यायालयाने रघुवीर बागकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंमलबजावणी संचालनालयातर्फे ( ईडी) गोव्यात काल, शुक्रवारी छापा टाकण्यात आला. परंतु कर्नाटकातून आलेल्या गाडयांचा ताफा अजूनही पाटो येथील ईडी कार्यालयासमोर उभा आहे. त्यामुळे ईंडी आज आणखी काही छापे टाकणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डिचोली येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक महिला स्कुटरचालक गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
मोले कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम गेली कित्येक दिवस बंद असल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्नाटक तसेच इतर भागातून येणाऱ्या तसेच दूधसागर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पैसे काढायचे असल्यास एटीएम सैदव्य बंद मिळत असते.तेव्हा बँकचे संबंधित ज्येष्ठ अधिकारी तसेच बँक व्यवस्थापकाने या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे व लवकरात लवकर एटीएम सुरू करावे अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.