Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुंडई येथील केडीला कंपनीच्या कामगारांची फोंडा येथे निर्देशने, वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये.

गोमंतक ऑनलाईन टीम

कुंडई येथील केडीला कंपनीच्या कामगारांची फोंडा येथे निर्देशने

कुंडई येथील केडीला कंपनीच्या कामगारांची फोंडा येथे निर्देशने. मागण्या पूर्ण न केल्यास दि.२६ ऑक्टोबर रोजी गुजरात येथील मुख्य कार्यलयात मोर्चा नेण्याचा कामगारांचा इशारा.

आमोणा साखळीत टर्फ फुटबॉल मैदानाचे उद्घाटन

आमोणा साखळी येथे सेसा कंपनीतर्फे सुमारे १ कोटी रू. खर्चून साकारलेल्या कृत्रिम टर्फ फुटबॉल मैदानाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मैदानाची निगा राखताना या मैदानावर दर्जेदार फुटबॉल स्पर्धा आयोजित करून महसूल उभा करावा व मैदानाची काळजी घ्यावी. असे आवाहन केले. या कार्यक्रमानंतर साखळी भाजप मंडळ व साखळी भाजप युवा मोर्चा असा प्रदर्शनीय फुटबॉल सामना खेळविण्यात आला. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभागी होऊन भाजप मंडळ संघाचे प्रतिनिधीत्व केले.

केजरीवाल यांना चर्चेसाठी आणा, तुम्ही त्यांना मदत करू शकता

जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटकर यांनी आप गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांना उत्तर दिले की, "केजरीवाल यांचा इतक्या लवकर बचाव करून, तुम्ही गोव्यातील लोकांना आधीच माहित असलेल्या गोष्टीची पुष्टी केली आहे. आता एक काम करा, अरविंद केजरीवाल यांना चर्चेसाठी आणा आणि तुम्ही त्यांना तिथेही मदत करू शकता, जसे तुम्ही या बेजबाबदार कृत्यात केले होते.

केरी चेकपोस्टवर बेळगावहून गोव्यात येणारे गोमास जप्त

केरी चेकपोस्टवर बेळगावहून गोव्यात येणारे इनोव्हा कार, KA25 B6719 बेकादेशीर 400 किलोचे गोमास जप्त, सोहील मुबारक बेपारी (27) राहणारा बेळगाव याला वाहनासह घेतले ताब्यात, बेकायदेशीर गोमास वाहतुक प्रकरणी 325 नुसार गुन्हा नोंद पुढील तपास सुरु

"पक्षासाठी नाही तर गोव्यासाठी काम"

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात स्वयंसेवकांच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित केले आणि जाहीर केले की प्रत्येक आप कार्यकर्ता "पक्षासाठी नाही तर गोव्यासाठी काम करत आहे."

अमित पाटकर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला!

मयेच्या खाणकामाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ मते विभागण्यासाठी गोव्याला भेट दिल्याचा त्यांच्यावर आरोप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Case: 'नीलेश शिरवईकरला बडतर्फ करा'! नावेलीवासीयांची मागणी; एडबर्ग मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; पेडणे तालुका नेहमीच चर्चेत

Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

Horoscope: मोठा धमाका! अडकलेले पैसे मिळणार; आठवड्याची सुरुवात 'या' राशींना देणार भरभरून

Montha Cyclone: ‘मोंथा’बाबत मोठी अपडेट! 'गोव्यात' पाऊस थांबणार की नाही? वाचा माहिती..

SCROLL FOR NEXT