Ankola Bus Accident Dainik Gomantak
गोवा

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Ankola Bus Accident: कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील अंकोला तालुक्यात कंचिनबागीलूजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शनिवारी भीषण अपघात झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

बंगळूर: कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील अंकोला तालुक्यात कंचिनबागीलूजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शनिवारी भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खासगी बस उलटून झालेल्या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बळ्ळारीहून गोव्याकडे येणारी ‘सीबर्ड’ कंपनीची खासगी बस अंकोला-यल्लापूर मार्गावरून प्रवास करत होती. कंचिनबागीलू परिसरात आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस महामार्गाच्या मधोमध उलटली.

बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. यापैकी आंध्र प्रदेशमधील शरणय्या (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच २० हून अधिक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना तातडीने अंकोला तालुका रुग्णालय तसेच कारवार येथील जिल्हा रुग्णालय (क्रिम्स) येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT