High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Bombay High Court At Goa: गोवा खंडपीठाचा निकाल आता कोकणीतून

गुड न्यूज : राजभाषा संचालनालय करणार भाषांतर, गोमंतकीयांकडून स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Bombay High Court At Goa मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार आहेत. त्यामुळे गोमंतकीयांना याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. यापूर्वी हे निकाल इंग्रजीसह मराठीतून उपलब्ध होत होते.

कोकणी ही गोव्याची राजभाषा असल्याने राज्य सरकार विविध मार्गांनी कोकणी भाषेचे संवर्धन, जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आता हायकोर्टाचे निकाल देखील कोकणी भाषेतून उपलब्ध केले जाणार आहेत.

गोवा राजभाषा संचलनालयाच्या सहकार्याने या निकालांचे कोकणी भाषेमध्ये भाषांतर केले जाणार आहे. सर्वसामान्य गोवेकरांना याचा मोठा लाभ होणार आहे.

कारण गोव्यात कोकणी भाषिकांची संख्या मोठी आहे. येथील बोलीभाषेत बहुसंख्य नागरीक कोकणीचाच वापर करतात. तसेच कोकणीच्या संवर्धन, जतनासाठी येथे प्रयत्न होत असतात.

अधिवेशनात कोकणी भाषा भवनाचा पुनरूच्चार

सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषा भवन बांधणार असल्याचा पुनरूच्चार केला होता. तसेच प्राचीन दस्तऐवज कोकणीत भाषांतरीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, कोकणी भाषांतरकार मिळत नसल्यावरून त्यांनी खंतही व्यक्त केली होती. राज्यात कोकणी भाषांतर करणे कठीण झाले आहे.

त्यासाठी भाषा संचालनालयाकडून विशेष उपक्रम राबविले जातील. विद्यार्थी कोकणी भाषेचा अभ्यास कसा करतील, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

न्यायालये आपले निकाल यापुढे कोकणी भाषेतून देणार असतील तर ती अत्यंत चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. न्यायदान हे सामान्य लोकांसाठी असते आणि त्यांना समजेल त्या भाषेतून त्याचा निकाल देणे ही गरज आहे. आणि तो लोकांचा अधिकारही आहे. या निकालांचा इतरांनाही त्यामुळे फायदा होईल, असे वाटते.

- अन्वेशा सिंगबाळ (अध्यक्ष, कोकणी भाषा मंडळ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

SCROLL FOR NEXT