Goa SSC Result 2026 Dainik Gomantak
गोवा

SSC Result 2026: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, कुठं पाहता येणार रिझल्ट?

Goa SSC Result 2026: गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यातील विद्यार्थी आणि पालक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या प्रतीक्षेचा अंत अखेर झाला आहे.

Sameer Amunekar

पणजी: गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यातील विद्यार्थी आणि पालक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या प्रतीक्षेचा अंत अखेर झाला आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHPE) मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १० वीच्या (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख आणि वेळ घोषित केली आहे. येत्या रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे.

१३ मार्च ते १९ एप्रिलदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. १० हजार ८१९ मुले आणि ९ हजार ८४० मुलींनी ही परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९५.३५ टक्के लागला होता. रविवारी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये हे पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करणार आहेत.

निकाल कुठे आणि कसा पाहाल?

विद्यार्थ्यांना आपला निकाल गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि जन्मतारीख तयार ठेवणे आवश्यक आहे.

याशिवाय निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच शाळांमध्ये निकालाचे एकत्रित पत्रक देखील उपलब्ध होईल. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकमुळे वेबसाइट संथ होऊ शकते, अशा वेळी विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT