GOA Board SSC Result 2022 Dainik Gomantak
गोवा

सत्तरी तालुक्यातील अनेक शाळांचा विक्रमी निकाल

सरकारी माध्यमिक विद्यालयांची यंदा चमकदार कामगिरी

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यातील अनेक सरकारी माध्यमिक विद्यालयांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. गोवा शालांत मंडळातर्फे काल सायंकाळी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. सरकारी माध्यमिक विद्यालयानी यंदा विक्रमी कामगिरी केली आहे.

सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेली, अडवई, नगरगाव, ठाणे, वाळपई, दाबे, सुर्ल, केरी तसेच श्री भूमिका हायस्कूल, विवेकानंद केरी यांचा शंभर टक्के निकाल लागला. विवेकानंद मंदिर केरी यांचा निकाल शंभर टक्के लागला. येथे 33 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सरकारी विद्यालय सुर्ला सत्तरीचा निकाल शंभर टक्के लागला. 14 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ते सर्व उत्तीर्ण झाले. सरकारी हायस्कूल दाबे येथील 7 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्व उत्तीर्ण हाेऊन शंभर टक्के निकाल लागला.

सरकारी हायस्कूल ठाणे-सत्तरी येथील 32 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्वजण उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. सरकारी हायस्कूल नगरगाव येथील 32 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. श्री भूमिका हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. एकूण 82 विद्यार्थी परीक्षेला बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले.

सरकारी हायस्कूल अडवई येथील 39 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. सरकारी हायस्कूल गुळेली येथील 28 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. सरकारी हायस्कूल केरी येथील 60 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. सरकारी हायस्कूल वाळपई येथील 24 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला.

सरकारी हायस्कूल भुईपाल यांचा 93.75 टक्के निकाल लागला. तसेच सरकारी हायस्कूल हाेंडा 91.3 टक्के, श्रीराम हायस्कूल खडकी 95.83 टक्के, सरकारी हायस्कूल सावर्डे 83.33 टक्के, सरकारी हायस्कूल माेर्ले 94.44 टक्के, सरकारी हायस्कूल पिसुर्ले 91.3 टक्के, सरकारी हायस्कूल शेळप 91.67 टक्के, श्री हनुमान हायस्कूल वाळपई 94.52 टक्के, युनिटी हायस्कूल वाळपई 92.59 टक्के, हाेंडा हायस्कूल 53.85 टक्के, नॅशनल हायस्कूल वाळपई 66.67 टक्के व अवरलेडी हायस्कूल वाळपई 92.47 टक्के निकाल लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT