GOA Board SSC Result 2022 Dainik Gomantak
गोवा

GOA Board SSC Result 2022 : गोव्यात दहावीचा निकाल 92. 75 टक्के‌

दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी; मुलींचा निकाल 93.91 तर मुलांचा 91.62 टक्के

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा शालान्त मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. गोव्यात दहावीचा निकाल 92. 75 टक्के लागला असून यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र आहे. मुलींचा निकाल 93.91 टक्के तर मुलांचा 91.62 टक्के लागला आहे. 20,572 परीक्षार्थीपैकी 18869 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (GOA Board SSC Result 2022)

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या
बारावीच्या परीक्षेप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. आज बुधवारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी ही माहिती दिली. यंदा दहावीचा निकाल 92.75 टक्के लागला.

राज्यातील 31 केंद्रे आणि 173 उपकेंद्रांवर दोन सत्रांत दहावीची परीक्षा झाली. पहिले सत्र 1 डिसेंबर 2021 ते 12 जानेवारी 2022, तर दुसरे सत्र 5 ते 22 एप्रिल 2022 यादरम्यान घेण्यात आले. या दोन्हीही सत्रांचे एकत्रित मूल्यांकन करून हा निकाल देण्यात आला.

या परीक्षेला एकूण 20 हजार 345 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 92.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 10 हजार 530 मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी 91.62 टक्के मुले उत्तीर्ण झाली, तर 10 हजार 42 मुली या परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 93.91 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

खासगी आयटीआय आणि रिपिटर विद्यार्थीही परीक्षेला बसले आहेत. याबरोबरच राज्यातील 104 केंद्रांवरून 480 विशेष विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचे प्रमाण 97.08 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT