10th exam result in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Board: आज दहावी परीक्षेचा निकाल

गोवा (Goa Board) राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) दहावी परीक्षेचा (10th exam) निकाल आज जाहीर होणार आहे. गोवा (Goa Board) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे यंदा दहावीच्या व बारावीच्या अंतिम परीक्षा घेण्यात आल्या नाहीत, त्या रद्द करण्यात आल्या आहेत व विद्यार्थ्यांना मूल्यांकन गुणांच्या आधारे, यापूर्वी झालेल्या चाचणी परिक्षांच्या गुणांच्या आधारे आणि खास स्थापन केलेल्या निकाल समित्यांच्या अहवालानुसार गुण देऊन निकाल जाहीर करण्यात येत आहे. (Goa Board: Results of 10th exam today)

दहावीच्या परीक्षा यंदा पहिल्यांदा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा दहावी परीक्षेसाठी 23,967 नियमीत विद्यार्थी बसले असून 517 पुन्हा बसलेले (रिपीटर्स) आहेत. यात मुलांची संख्या 13,011, तर मुलींची संख्या 10,956 आहे.

दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (10th Exam) ठरवण्यासाठी गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक खास धोरण तयार केले होते. महत्वाच्या बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेचा निकाल ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून निर्णय देण्यात आला होता.

https://www.youtube.com/watch?v=cl3Qo9Dbdcgसीबीएससीच्या नियमावलीचा आधार घेऊन एक खास धोरण तयार करण्यात आले होते. प्रत्येक शाळांमध्ये त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या अध्यक्षतेखाली एक निकाल समिती स्थापन करण्यात आली होती. भाषा विषयाचे व इतर विषयाचे शिक्षकही या समितीमध्ये सामील होते. ज्या हायस्कूलची शिक्षकांची संख्या 50 पेक्षा कमी आहे, त्या हायस्कूलसाठी शेजारच्या हायस्कूलमधील एक शिक्षकाचा निकाल समितीमध्ये समावेश करण्यात आला होता. शिक्षण मंडळाचा प्रतिनिधी म्हणून हा शिक्षक या निकालावर लक्ष ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT