goa jp nadda

 
गोवा

'खरी लोकशाही केवळ भाजपमध्येच'

दैनिक गोमन्तक

म्हापसा : देशभरात खरी लोकशाही केवळ भाजपमध्येच आहे, व या पक्षाने घराणेशाहीला पूर्णत: तीलांजली दिलेली आहे. असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. म्हापसा येथे भाजपतर्फे आयोजित देवस्थान पदाधिकारी संमेलनात मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.

गोव्यातील नेते नेते श्रीपाद नाईक, विनय तेंडूलकर, या व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य भाजप नेत्यांची तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेते राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांची उदाहरणे त्यांनी यासंदर्भात दिली.

या नेत्यांच्या घराण्यात कुणीही राजकारणी (Politics) नसताना ते भाजपचे नेते बनले, असेही ते म्हणाले. माझ्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती भाजप (BJP) या जगभरातील सर्वाधिक मोठ्या राजकीय संघटनेचा अध्यक्ष होतेय यापेक्षा मोठी लोकशाही काय होऊ शकते, असा सवालही नड्डा यांनी केला.

या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, (Pramod Sawant) केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे, माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर, सभापती राजेश पाटणेकर, आमदार दयानंद सोपटे, निळकंठ हळर्णकर, माजी आमदार दयानंद मांद्रेकर व माजी खासदार (MP) नरेंद्र सावईकर यांची उपस्थिती होती.

नड्डा पुढे म्हणाले, भाजप अन्य राजकीय पक्षांपेक्षा वेगळाच आहे. विशिष्ट विचारधारेचा हा पक्ष आहे. जनतेच्या कृपाआशीवार्दाने उभा राहिलेला हा पक्ष अल्पावधीतच सर्वसामान्य लोकांचा जगभरातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनला. शरीर, मन, बुद्धी व समाज यांच्या विकासासाठी कार्यरत असलेला हा पक्ष आहे. इतर पक्ष समाजाची विभागणी करून विकासाला खंडित करीत असतात. परंतु, भारतभरात भाजप हा त्याला एकमेव अपवाद आहे, असा दावाही, त्यांनी केला.

देशातील पन्नास कोटी लोकांना अर्थांत चाळीस टक्के लोकांना आरोग्यविषयक पाच लाख रुपयांचे आरोग्यविषयक संरक्षक कवच देण्याचे कार्य मोदी सरकारने केले आहे, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले. सध्या जगभरात आरोग्यविषयक संरक्षणछत्र सर्वाधिक प्रमाणात भारतातच आहे, असा दावाही त्यांनी केला. गुन्ह्यांचा छडा लावण्यात गोवा प्रथम क्रमांकावर असून, गोव्यातील सुमारे 93 टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्णत्वास आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सदानंद तानावडे म्हणाले, विविध देवस्थानांचे कित्येक पदाधिकारी भाजपशी जोडले गेले ते मंदिरांच्या कार्यातूनच. राम मंदिराचे निर्माण हे त्यासंदर्भात मुख्य कारण ठरले. गोव्यात कित्येक छोटीमोठी मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांत भजनाची, आरती गायनाची, घुमटवादनाची दीर्घकालीन परंपरा आहे. ही परंपरा टिकवून ठेवण्याचे कार्य सध्याची युवा पिढी उत्साहाने करीत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे व त्याबाबत देवस्थानांच्या कार्यकारिणींचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.

आमदार दयानंद सोपटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. किशोर अस्नोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, भाजपच्या पदाधिकारी रोशन नाईक स्नेहा नाईक व इतरांनी पुष्पगुच्छे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मरक्षण केले : मुख्यमंत्री (CM)

प्रत्येकाच्या जीवनात देव, देश आणि धर्म हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच संस्कृतीचे (Culture) रक्षण करण्यासाठी गोव्यात मोठ्या संख्येने मंदिरे कार्यरत आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मरक्षण केले आहे. गोव्यात (goa) राज्य सरकारतर्फे केवळ समुद्रकिनारी भागांतील पर्यटनावर भर न देता अंतर्गत भागांतील पर्यटनावर भर दिला जात आहे. त्या दृष्टीने प्रत्येक मंदिर सुशोभित करून पर्यटकांना आकर्षिक करणे आवश्यक आहे.

धर्माच्या शिकवणुकीनुसार आचरण असावे : श्रीपाद नाईक

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले, धर्माने दिलेल्या शिकवणीनुसार स्वत:चे आचरण असणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या तत्त्वानुसार आम्ही वागलो तर अशिक्षित व्यक्तीही सुसंस्कृत होईल. राममंदिराच्या निर्माणकार्यात आतापर्यंत गोव्यातील मंदिरांच्या कार्यकर्त्यांनी योग्य तो सहभाग दर्शवला आहे. देशात रामराज्य आणणे हे प्रत्येक देशबांधवावर अवलंबून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT