Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: सदानंद शेट तानावडेंना पुन्हा व्हायचंय 'प्रदेशाध्यक्ष'? त्यांनीच बोलून दाखवली इच्छा

Goa BJP State President Election: २० जानेवारीपर्यंत भाजपच्या गोवा राज्य प्रदेशाध्यक्षांची निवड अपेक्षित असून, केंद्रीय नेतृत्व नवीन प्रदेशाध्यक्ष ठरविणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP State President Election

डिचोली: भाजपच्या गोवा प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुन्हा सदानंद शेट तानावडे यांचे नाव चर्चेत आहे. तानावडे हे शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त मये येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना तानावडे यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात आपणही इच्छुक असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले. पक्ष नेतृत्वाने पुन्हा संधी दिल्यास ती स्वीकारण्यास मी तयार आहे, असेही ते म्हणाले.

२० जानेवारीपर्यंत भाजपच्या गोवा राज्य प्रदेशाध्यक्षांची निवड अपेक्षित असून, केंद्रीय नेतृत्व नवीन प्रदेशाध्यक्ष ठरविणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

'टूलकिट' प्रकरण फारसे गंभीर नसून, तो मीडियाकडून केला जाणारा अपप्रचार आहे, असे म्हणत तानावडे यांनी याप्रकरणी अधिक भाष्य करण्याचे टाळले. २०२० साली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ मी यशस्वीरित्या पूर्ण केला.

भाजपचे कार्य मजबूत करताना प्रदेशाध्यक्ष पदाला न्याय मिळवून दिला आहे. भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षात सन्मान करण्यात येतो.

त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण, याचा आताच अंदाज बांधणे बरोबर नाही, असेही तानावडे म्हणाले. नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असावा, त्याबाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT