BJP President J.P Nadda  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राज्यव्यापी दौऱ्यावर

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासुन गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) 23 आणि 24 जुलै रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. येत्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. दोन दिवसांच्या गोव्या दौऱ्यात जे.पी नड्डा पक्षाच्या विविध शाखांशी बैठक घेणार आहेत.

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासुन गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 23 आणि 24 जुलै रोजी गोव्याच्या दौऱ्यालर असणार आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात जेपी नड्डा यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष आणि गोवा प्रभारी सी.टी. रवी हेदेखील असणार असल्याची माहीती मिळाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वीच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे देखील गोवा दौऱ्यावर होते, तसेच आपच्या आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांचे दौरे गोव्यात सुरु आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे यापूर्वीचा 12 आणि 13 जुलै रोजी गोवा दौरा करणार होते, मात्र काही कारणास्तव रद्द करण्यात आला होता. जेपी नड्डांची गोव्याचा हा दौरा 23 आणि 24 जुलै रोजी आयोजीत करण्यात आला आहे. असे म्हटले जातेय की, जेपी नड्डा फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पक्षाच्या तयारीसाठी आढावा बैठक घेतील. दुसरीकडे, भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट्टा तनावडे म्हणाले की, भाजपने सध्या लक्ष संघटनेच्या बळकटीकरणावर केंद्रित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT