Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'चंदा चोरी भवन' म्‍हणून हिणवणाऱ्या काँग्रेसच्या टीकेवर भाजपचा पलटवार; CM सावंत, दामू नाईक आक्रमक

BJP Congress Funding Row: प्रदेश भाजपच्‍या नव्‍या भवनाला ‘चंदा चोरी भवन’ म्‍हणून हिणवणाऱ्या काँग्रेसवर भाजपनेही जोरदार हल्लाबोल केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: प्रदेश भाजपच्‍या नव्‍या भवनाला ‘चंदा चोरी भवन’ म्‍हणून हिणवणाऱ्या काँग्रेसवर भाजपनेही जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्‍या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या परिश्रमातून आणि विविध पारदर्शक मार्गांनी निधी संकलित करून पक्षाच्या नवीन कार्यालयाची उभारणी केल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्‍हणाले. तर, ७० वर्षांत देशाला लुबाडून स्‍वत:च्‍या तुंबड्या भरणाऱ्यांना भाजपच्‍या नव्‍या भवनावर बोलण्‍याचा नैतिक अधिकार नसल्‍याची टीका भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी केली.

कदंब पठारावर उभारण्यात आलेल्या भाजपच्‍या नव्‍या भवनाचे येत्‍या ६ सप्‍टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. त्‍याआधी गुरुवारी दामू नाईक यांच्‍या यजमानपदाखाली वास्तू शांतीचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह इतर मंत्री आणि भाजप पदाधिकारीही यावेळी उपस्‍थित होते. परंतु, भाजपने जनतेला लुबाडून या भवनाची उभारणी केल्‍याचा आरोप करीत, हे भाजप भवन नसून ‘चंदा चोरी भवन’ असल्‍याची टीका विरोधी काँग्रेसने केली.

पत्रकारांशी बोलताना मुख्‍यमंत्री डॉ. सावंत म्‍हणाले, ‘‘ज्या काँग्रेस पक्षाला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही आणि देशही चालवता आला नाही, त्यांना भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळावर हे भवन उभे केले आहे. अनेक वर्षे देशावर सत्ता गाजवलेल्‍या काँग्रेसला अजूनही स्वतःचे कार्यालय उभारता आलेले नाही.’’

निधीचा तपशील जाहीर करा : काँग्रेस

भाजपचे नवीन कार्यालय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या योगदानातून उभारण्‍यात आल्‍याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भवनासाठी जमा केलेल्‍या निधीचा संपूर्ण तपशील जाहीर करावा’’, असे आव्हान काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी दिले. ‘‘बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक रुपया कायदेशीर आणि योग्य हिशोब असलेल्या मार्गांनीच आला होता, हे स्पष्ट करण्‍यास तसेच निधीचा संपूर्ण स्रोत आणि प्रवासाचा तपशील (फंडिंग ट्रेल) सार्वजनिक करण्यास भाजप तयार आहे का?’’, असे सवाल त्‍यांनी केले.

काँग्रेसचा पोटशूळ उठला

भाजपचे राज्‍यभरातील कार्यकर्ते तसेच हितचिंतकांकडून मिळालेल्‍या निधीतून या भवनाची उभारणी करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे काँग्रेसने भवनाच्‍या उभारणीबाबत आम्‍हाला प्रश्‍‍न विचारू नये. काँग्रेसला अजूनही स्‍वत:च्‍या कार्यालयाची दुरुस्‍ती करता आलेली नाही. त्‍यामुळे भाजपचे नवे भवन बघून त्‍यांचा पोटशूळ उठला आहे, असे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT