J. P. Nadda Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा दुसऱ्यांदा नियोजित दौरा रद्द !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचा नियोजित गोवा दौरा रद्द झाल्यामुळे भाजपचे नेते व कार्यकर्ते यांचा हिरमोड झाला आहे.

दैनिक गोमन्तक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचा नियोजित गोवा दौरा रद्द झाल्यामुळे भाजपचे नेते व कार्यकर्ते यांचा हिरमोड झाला आहे. गेल्या वर्षभरात नड्डा यांचा दौरा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष (B.L Santhosh) यांनी गोव्याचा (Goa) दौरा करून राजकीय अंदाज घेतल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचा हा दौरा नक्की करण्यात आला होता.

या दौऱ्यासाठी भाजपचे प्रभारी कर्नाटकातील आमदार सी.टी. रवी (C.T Ravi) हे कालपासूनच गोव्यात दाखल झालेले आहेत. सोमवारी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकांची तयारी भाजपच्या कार्यालयात सुरू होती. प्रदेश संघटन सचिव सतीश धोंड यांनी या सर्व बैठकांचे नियोजन केले होते. विवांता या तारांकित हॉटेलमध्ये या सर्व बैठका होणार होत्या. निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा नड्डा यांच्यासमोर सादर करण्यासाठी एक तटस्थपणे तयार करून घेण्यात आलेला अहवालही तयार ठेवण्यात आला होता.

मात्र नड्डा यांचा दौरा रद्द झाल्याचे आज सकाळी समजले आणि या सर्व तयारीवर पाणी पडले आहे.दरम्यान हा दौरा रद्द झाला तरी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जी तयारी सुरू केलेली आहे तिचा वेग कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदींनी प्रमुख नेत्यांना आज सकाळपासूनच नड्डा यांचा दौरा रद्द झाल्याचा संदेश पाठवताना निवडणूक तयारीचे काम सुरू ठेवण्याची सूचना केलेली आहे.

दरम्यान आज पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत तानावडे यांनी पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत आयोजित करण्यात आल्यामुळे जे पी नड्डा यांचा गोवा दौरा रद्द झाल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT