BJP MLA Pravin Arlekar Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: धारगळमध्ये 'सनबर्न' होणार नाही म्हणजे होणारचं नाही... भाजप आमदार आर्लेकरांचा थेट इशारा!

BJP MLA Pravin Arlekar: राज्यात सध्या सनबर्नच्या विषयावरुन राळ उठली आहे. धारगळसह पेडण्यात आम्हाला सनबर्न नको म्हणत, भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली.

Manish Jadhav

धारगळ: राज्यात सध्या सनबर्नच्या विषयावरुन राळ उठली आहे. धारगळसह पेडण्यात आम्हाला सनबर्न नको म्हणत, भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. मला विश्वासात न घेता धारगळमध्ये सनबर्न करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणत आर्लेकरांनी खंतही व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून धारगळह पेडणेतील नागरिक सनबर्नच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. एवढचं काय तर सनबर्नवरुन पेडणेत दोन गट पडले आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की, सनबर्नचे आयोजन करण्यात यावे तर दुसरा गट यास कडाडून विरोध करत आहे.

आमदार आर्लेकर काय म्हणाले?

केवळ धारगळमध्येच (Dhargal) नाही तर पूर्ण पेडणे तालुक्यात आम्हाला सनबर्न नको आहे. मला विश्नासात न घेता धारगळमध्ये सनबर्न करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सत्तेत असूनही प्रत्येकवेळी मला लोकांसोबत रस्त्यावर उतरावे लागते. धारगळमध्ये सनबर्न होणार नाही म्हणजे नाही. सोमवारी (2 डिसेंबर) होणाऱ्या पंचायत बैठकीत सनबर्नला परवानगी दिल्यास मी आत घुसून काय ते दाखवून देईन, अशी तंबी भाजप आमदार आर्लेकरांनी दिली.

सनबर्नवरुन दोन गट

धारगळ येथे सनबर्नसाठी जी जागा निवडण्‍यात आली आहे, त्‍या भागात रुग्णालये (Hospital) आहेत आणि त्‍यामुळे तिथे आयोजनाला परवानगी देणे योग्‍य नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली असतानाच समर्थनार्थ एक गट उभा ठाकला आहे. सनबर्नमुळे व्‍यावसायिक चालना मिळेल, अशी त्‍यांची भूमिका आहे. परिणामी ईडीएम आयोजनावरुन पेडणेकर विरुद्ध पेडणेकर अशी स्‍थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT