Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: चार लाखांपेक्षा जास्त सदस्यांचे भाजपचे उद्दिष्ट; कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Goa BJP Workshop: भारतीय जनता पक्षाने २०२७च्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून संपूर्ण गोव्यात सदस्य मोहीम राबविण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: गोव्यात भारतीय जनता पक्षाने २०२७च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून सध्या संपूर्ण गोव्यात सदस्य मोहीम राबविण्यात आली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. अशाच प्रकारची एक कार्यशाळा शनिवारी भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कचेरीत आयोजित करण्यात आली होती.

गेल्यावेळी गोव्यात चार लाख सदस्य करण्यात आले होते. यावेळी त्यापेक्षा जास्त सदस्य करण्याचे उद्दीष्ट असल्याचे पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. राज्यस्तरावरील कार्यशाळा पणजीत झाली व ही जिल्हास्तरीय कार्यशाळा असून यात दक्षिण गोव्यातील कार्यकर्ते सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाचे कार्यकर्ते गावागावांमध्ये जाऊन सदस्य नोंदणी करतील त्याचप्रमाणे ऑनलाईन सदस्य होण्याचाही पर्याय आहे. यासंदर्भातील माहिती कार्यकर्त्यांना टप्प्याटप्प्याने कळविली जाईल, असेही सावईकर यांनी सांगितले. याप्रसंगी अन्य सरचिटणीस दामोदर नाईक, भाजपचे दक्षिण गोवा जिल्हा समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांवर पूर्ण विश्र्वास

या कार्यशाळेत सदस्य करण्याची मोहीम कशी असेल याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सरकारचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व यावरून सदस्य संख्या निश्चितच वाढेल, असा विश्र्वास सावईकर यांनी व्यक्त केला. आमचा लोकांवर पूर्ण विश्र्वास आहे व ते आम्हाला चांगला प्रतिसाद देतील, असे सावईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

Robert Connolly At IFFI: 'भारतीय चित्रपटांतील विविधता वाखाणण्याजोगी..'; ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाने केले द्विराष्ट्रीय संबंधांवर महत्त्वपूर्ण भाष्य

Tribal Community Reservation Bill: अधिवेशनाच्या तोंडावर ‘धनगर गवळी’ समाजाची धडपड! राजकीय आरक्षणाच्या मागणीला जोर

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

SCROLL FOR NEXT