Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: खासदार सदानंद शेट तानावडे पक्ष कार्यात व्यस्त, दिल्लीहून येताच राज्यात बैठकांचा सपाटा सुरू

अनेकांच्या गाठीभेटी ः दिल्लीहून येताच राज्यात विविध बैठकांचा सपाटा सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP राज्यसभा सदस्य म्हणून दिल्लीत नवी इनिंग सुरू केल्यानंतरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी शनिवार व रविवार हे संसदेच्या सुटीचे दिवस पक्ष कार्यासाठी दिले आहेत.

दिवसभर ते पक्षाच्या विविध बैठकांत व्यस्त राहिले. आमदार मायकल लोबो यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सायंकाळी ते आपल्या राज्यासह तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमधील पंचायत सदस्य प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहिले.

दोनापावल येथेच भाजपच्या निवडक नेत्यांची बैठकही त्यांनी घेतली. त्या बैठकीत मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.

तानावडे यांनी दिवसभराच्या धावपळीतून वेळ काढत कळंगुट येथील भाऊ वेर्लेकर या पक्षाच्या 80 वर्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषण स्मृती दिवस पाळण्यासाठीच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि ती जबाबदारी सरचिटणीस दामोदर नाईक यांच्याकडे सोपवली.

त्याशिवाय मेरा देश मेरा भारत योजनेंतर्गत मोटारसायकल फेरीसह 9 ते 15ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांच्याकडे जबाबदारी दिली. पीर्ण येथील विद्यालयाच्या सभेलाही उपस्थिती दर्शवली.

संघटनात्मक कामाचा आढावा

आमदार प्रेमेंद्र शेट, दाजी साळकर, उल्हास नाईक तुयेकर, संकल्प आमोणकर आणि केदार नाईक यांना विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यातील प्रत्येकी एका मतदारसंघात संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी विस्तारक म्हणून 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान पाठवण्यात येणार आहे.

त्याच्या पूर्वतयारीची आणि तेथे नेमके काय करणे अपेक्षित आहे, याची बैठक तानावडे आज रविवारी घेणार आहेत. त्याशिवाय राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा दौराही करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT