BJP strategy for Goa elections Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections 2027: आगामी विधानसभेसाठी भाजपचा जनसंपर्कावर विशेष भर; आदिवासी आरक्षणाचा विषय चर्चेचा केंद्रबिदू

Goa BJP Core Committee Meeting: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जनसंपर्क अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जनसंपर्क अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या राज्य गाभा समितीच्या बैठकीत संघटनात्मक बांधणी, जनतेशी थेट संपर्क वाढवणे आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाची उपस्थिती मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, येत्या शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गाच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. कार्यकर्त्यांना संघटनात्मक पातळीवर अधिक सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बारा वर्षे पूर्ण केल्याबद्दल बैठकीत अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि आसाममध्ये भाजपने सरकार स्थापन केल्याबद्दल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचेही अभिनंदन करण्यात आले.

बैठकीत आदिवासी आरक्षणाचा विषयही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील चार मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. पक्ष संघटनेच्या माध्यमातूनही केंद्र सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले

‘कॉकरोच जनता पार्टीचा परिणाम नाही’

प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी विरोधकांवर टीका करताना ‘कॉकरोच जनता पार्टीचा’ भाजपवर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजप हा एका रात्रीत १४ कोटी सदस्यांसह उभा राहिलेला पक्ष नाही. त्यामागे ४७ वर्षांचा संघर्ष आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम आहेत, असे ते म्हणाले. तसेच, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे फॉलोवर्स विदेशात आहेत, हे सत्य आता लपून राहिलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

‘मन की बात’ साठी खास व्यवस्था

३१ मे रोजी होणारी ‘मन की बात’ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी सामूहिक श्रवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे दामोदर नाईक यांनी सांगितले. याशिवाय ५ जूनचा पर्यावरण दिन आणि २१ जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन पक्षाने आखले आहे.

मनोज परब यांच्या राजीनाम्यावरही टीका

मनोज परब यांनी दिलेल्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना नाईक म्हणाले की, हा राजीनामा केवळ राजकीय नाट्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनता सर्व काही पाहत आहे आणि ती योग्य वेळी निर्णय घेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT