Goa police AI tool Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: गोव्यातील BITS च्या विद्यार्थ्यांनी बनवलं सायबर सुरक्षेचं 'ब्रह्मास्त्र'; थेट अमित शहांकडून कौतुकाचा वर्षाव

BITS Pilani Goa: बिट्स पिलानी, गोवा कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी इंटरनेटवरील खोडसाळ माहिती ओळखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातच नाही तर देशभरात सध्या सायबर गुन्हेगार वाढतायत. या सायबर गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी बिट्स पिलानी, गोवा कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले असून, गोवा पोलिसांनी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

'रेडिकल कंटेंट एनलाईझर' आणि 'फेक युआरएल डिटेक्शन'

या तंत्रात 'रेडिकल कन्टेन्ट' शोधून काढला जाईल आणि 'खोट्या वेबसाइट' देखील शोधल्या जाणार आहेत. या दोन महत्त्वाच्या तंत्रज्ञानांमुळे सुरक्षा यंत्रणांना सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. रोहित राज आणि उत्कर्ष द्विवेदी या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान, समाजात द्वेष आणि हिंसा पसरवणाऱ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

गोवा पोलिसांच्या हॅकॅथॉनमध्ये मिळालेल्या समस्येवर काम करत, त्यांनी 'रेडिकल कन्टेन्ट एनलाईझर' नावाचे एक उपकरण तयार केले. या उपकरणाद्वारे, व्हिडिओची विस्तृत तपासणी करून तो हिंसा, द्वेष किंवा भेदभावाला प्रोत्साहन देतो का, याची तपासणी करता येते. या तंत्रज्ञानामुळे, यूट्यूब किंवा ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले व्हिडिओ तपासता येतात. व्हिडिओचा युआरएल पेस्ट करून किंवा व्हिडिओ अपलोड करून, हे उपकरण 'रॅडिकल प्रोबॅबिलिटी स्कोर' आणि 'रॅडिकल कंटेंट परसेंटेज' यांसारखी माहिती पुरवते. पाच वेगवेगळ्या निकषांवर आधारित विश्लेषणामुळे, व्हिडिओ काढायचा की नाही, हे ठरवणं सोपं होणार आहे.

'फेक युआरएल डिटेक्शन' तंत्रज्ञानामुळे, खऱ्या आणि खोट्या वेबसाइटमधील फरक ओळखता येईल, ज्यामुळे सायबर फसवणुकीपासून बचाव करणे शक्य होणार आहे. बिट्स पिलानीचे संचालक आणि प्राध्यापकांनी या प्रकल्पाला आवश्यक ते सर्व सहकार्य केल्याने हे तंत्रज्ञान विकसित करणे शक्य झालेय.

सामान्य नागरिकांना मिळणार मदत

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे केवळ सुरक्षा यंत्रणांनाच नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही सायबर विश्वातील धोक्यांपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. हे तंत्रज्ञान सायबर युगातील सुरक्षेच्या दिशेने बचावासाठी तयार करण्यात आलेले महत्वाचे तंत्र आहे, जे समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT