Goa Bird Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Bird Festival: गोवा पक्षी महोत्सवाच्या तारखा जाहीर, पक्षीप्रेमी- अभ्यासकांसाठी पर्वणी

Goa Bird Festival: गोव्याला लाभलेली वनसंपदा यामुळे गोव्यात पक्षांच्या निरनिरळ्या प्रजाती आणि त्यांचे अधिवास इथे पाहायला मिळतात.

Ganeshprasad Gogate

Goa Bird Festival: वन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेला बर्ड फेस्टिवल म्हणजेच पक्षी महोत्सव येत्या 27 ते 29 जानेवारीमध्ये राजधानी पणजी नजीकच्या इंटरनॅशनल सेंटर गोवा, दोनापावला येथे होणार आहे.

यंदाचा हा 7 वा महोत्सव असून हे फेस्टिवल म्हणजे विद्यार्थी, पक्षी प्रेमी आणि पक्षीशास्त्रज्ञांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

तीन दिवसीय या महोत्सवात पक्षी निरीक्षण, तज्ञांचे विचार सत्र, वेबिनार, पक्षी अभ्यासाची चाचणी घेण्यासाठी स्पर्धा, ऑनलाइन स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन यासारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे.

समुद्र किनारपट्टी आणि गोव्याला लाभलेली वनसंपदा यामुळे गोव्यात पक्षांच्या निरनिरळ्या प्रजाती आणि त्यांचे अधिवास इथे पाहायला मिळतात.

त्यामुळे साहजिकच या वर्षीच्या महोत्सवात गोव्यातील पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

या अनोख्या कार्यक्रमांसाठी विद्यार्थी, पक्षी प्रेमी आणि पक्षीशास्त्रज्ञांनी नोंदणी करण्याचे आवाहन राज्याच्या वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रियेला सुरुवाात झाली असून ती 20 जानेवारीपर्यंत चालेल. तसेच अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी गोवा बर्ड फेस्टिव्हलच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन देखील करण्यात आलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT