Sudin Dhavalikar | Goa News Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar: वर्षभरात वीज खात्यात सुधारणा करणार

Sudin Dhavalikar: डिचोलीत वीजवाहिनी कामाचा शुभारंभ

दैनिक गोमन्तक

Sudin Dhavalikar: चांगली वीज पुरवठा सेवा देण्यासाठी वीज खाते गंभीर असून, येत्या वर्षभरात वीज खात्यात सुधारणात्मक बदल दिसून येईल. अशी ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी देतानाच दर्जात्मक काम करण्यात निष्काळजीपणा कारवाई करण्यासही मागे राहणार नाही. असा इशारा दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे गेल्या नऊ महिन्यात वीज खात्यातर्फे 350 कोटींचे प्रकल्प हाती घेतले आहेत. असे श्री. ढवळीकर यांनी सांगून जनतेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. डिचोलीत भूमिगत 11 केव्ही वीजवाहिन्या घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर वीजमंत्री श्री. ढवळीकर बोलत होते.

या कामावर जवळपास 32 कोटी रुपये खर्च येणार आहे. यावेळी वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंता रामचंद्र मुद्रास, नगराध्यक्ष कुंदन फोगेरी, उपनगराध्यक्ष सुखदा तेली, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर आणि मुळगावची सरपंच तृप्ती गाड उपस्थित होते. ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांच्या हस्ते यंत्राचे पूजन करण्यात आले.

स्टिफन फर्नांडिस यांनी स्वागत केले. ऐश्वर्या च्यारी हिने सूत्रसंचालन केले. रामचंद्र मुद्रास यांनी आभार मानले. या सोहळ्यास डिचोली पालिकेचे नगरसेवक, विविध पंचायतींचे पंच, वीज खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

डिचोलीतील वीज समस्या सुटणार

भूमिगत विजवाहिन्या ही भविष्याची गरज असून, या सुविधेमुळे डिचोलीतील वीज समस्या सुटण्यास मदत होणार आहे. डिचोली पालिका क्षेत्रासह मुळगावहून अस्नोडापर्यंत मिळून 45 किलोमीटर अंतर व्यापले जाणार. असे डॉ. शेट्ये यांनी सांगून, डिचोलीतील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ‘विवेकानंद भवन’चे 11सप्टेंबर रोजी लोकार्पण

Goa Politics: खरी कुजबुज; पाचव्या मृत्यूने गूढ वाढले

Goa Literacy: अभिमानास्पद! गोवा साक्षरतेत देशात अव्वल; 99.27 टक्के नागरिक शिक्षित

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

Goa London Flight: लंडन-गोवा विमानसेवा रद्द! Air Indiaचा निर्णय; अहमदाबाद, अमृतसर सेवा होणार सुरु

SCROLL FOR NEXT