Goa News |Marigold Dainik Gomantak
गोवा

Goa News: डिचोलीत उशिराने का होईना परिसर झाला 'झेंडूमय'

Goa News: दिवाळीपासून स्थानिक झेंडूची फुले बाजारात उपलब्ध झाली आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: यंदा उशिराने का होईना, डिचोलीत केशरी-पिवळ्या फुलांनी झेंडूचे मळे बहरले असून, दिवाळीपासून स्थानिक झेंडूची फुले बाजारात उपलब्ध झाली आहेत. दसऱ्याला नाही, तरी आता दिवाळीला फुले मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.

असंतुलित पावसामुळे यंदा झेंडू फुलांचा बहर लांबणीवर पडला होता. तालुक्यातील डिचोली आणि साखळी विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दिवाळी सणाच्या दोन दिवसांत एक टनहून अधिक स्थानिक मळ्यातील झेंडू फुलांची विक्री झाल्याचा अंदाज आहे.

दसऱ्यात तुटवडा

कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेंतर्गत डिचोलीतील विविध भागांत ‘झेंडू’ची लागवड करण्यात आली आहे. तरी यंदाच्या दसरोत्सवात ‘झेंडू’चे मळे फुलांनी बहरलेले नव्हते. त्यामुळे स्थानिक झेंडूची फुले दुर्मिळ झाली होती. परिणामी डिचोलीवासीयांना राज्याबाहेरून येणाऱ्या झेंडू फुलांवरच अवलंबून राहावे लागले होते.

अडीच हेक्टर क्षेत्रफळात लागवड

कृषी खात्याच्या सहकार्याने यंदा बोर्डेसह बाराजणनगर-धबधबा, साळ, पिळगाव, मये, न्हावेली, मेणकुरे आदी भागांत मिळून डिचोलीत अडीच हेक्टर जमीन झेंडू लागवडीखाली आली आहे. जवळपास 30 हून अधिक शेतकऱ्यांनी ही लागवड केली आहे.

निलिमा गावस,विभागीय कृषी अधिकारी-

डिचोलीतील कातरवाडा-धबधबा महिला शेतकरी गटाने सामूहिकपणे झेंडूची लागवड केली आहे. हा मळा आता पिवळ्या-केशरी फुलांनी फुलला आहे. न्हावेली, मेणकुरे आदी भागांतही मळे झेंडू फुलांनी फुलले आहेत.

बाजारपेठेसाठी प्रयत्न: झेंडू फुलांना बाजारपेठ मिळावी म्हणून गोवा फलोत्पादन महामंडळाला प्रस्ताव देण्यात आला आहे. तूर्तास बाजारातील फुले विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक शेतकऱ्यांना दिलेले आहेत, अशी माहिती ‘आत्मा’च्या तांत्रिक व्यवस्थापक पूनम महाले आणि शीतल डेगवेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT