Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture Department: डिचोलीत 25 हेक्टर भातशेती पाण्यात ! शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज

पावसाने उसंत घेतल्याने तरवा लावण्याचे काम जोरात

Ganeshprasad Gogate

Goa Agriculture Department पावसाच्या तडाख्यात पाण्याखाली गेलेल्या डिचोलीतील विविध भागातील मिळून 25 हेक्टरहून अधिक शेतीची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सलग बारा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या वेगवेगळ्या भागातील शेतीची विभागीय कृषी कार्यालयाकडून पाहणी करण्यात आली.

दरम्यान, नुकसान भरपाई मिळण्याकरिता शेतकऱ्यांकडून अर्जही करण्यात येत आहेत, अशी माहिती डिचोली विभागीय कृषी कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.

तरवा लावणीच्या कामाची लगबग सुरु झाली असतानाच, जवळपास दहा ते बारा दिवस पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे मये, पिळगाव, शिरगाव, व्हाळशी आदी भागातील शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे लावणी करण्यात आलेल्या तरव्याचीही नासाडी झाली.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बहुतेक शेतकऱ्यांचा खर्च तसेच मेहनत वाया गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ''शेतकरी आधार'' योजनेंतर्गत भरपाई मिळणार आहे. विभागीय कृषी कार्यालयाकडून तशी माहितीही देण्यात आली आहे.

बळीराजा उतरला शेतात...

पावसाच्या धुमाकुळामुळे गलितगात्र बनलेल्या बळीराजाने आता पुन्हा शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर बळीराजा निराशा झटकून पुन्हा शेतात उतरला दिसत आहे.

पावसाच्या तडाख्यातून सुरक्षित राहिलेल्या आणि जमवाजमव करून तरव्याची लावणीची कामे करण्यात येत आहेत. पिळगाव, मये आदी भागात सध्या हे चित्र दिसून येत आहे.

मयेत सर्वाधिक नासाडी

पाऊस ओसरल्यानंतर विभागीय कृषी कार्यालयाकडून विविध भागातील शेतीची नासाडी करण्यात आली आहे. डिचोली विभागीय कृषी कार्यक्षेत्रात येणाऱ्या मये भागातील शेतकऱ्यांना पावसाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे.

त्याच्या पाठोपाठ शिरगाव आणि पिळगाव भागातील शेतीची हानी झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधत असून, काहींनी सोपस्कारही पूर्ण केले आहेत, अशी माहिती कृषी विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जोग यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT