Dengue Dainik Gomantak
गोवा

Bicholim Dengue Case: म्हापश्या पाठोपाठ डिचोलीत ‘डेंग्यू’ची साथ, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

आरोग्य केंद्रातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Dengue Case मलेरिया आदी साथीचे आजार नियंत्रणात असले, तरी डिचोलीत ‘डेंग्यू’ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. शहरासह डिचोलीतील वेगवेगळ्या भागात ‘डेंग्यू’ची साथ कायम असून, अजूनही डेंग्यूचे सहा रुग्ण असल्याची माहिती डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्राच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

डिचोलीत डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आले असले, तरी परिस्थिती गंभीर नाही. असा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यातील काही भागात ‘डेंग्यू’ने डोके वर काढले असून, डिचोलीत ‘डेंग्यू’चे सहा रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

हावजिंग बोर्ड, मेणकूरेसह मये परिसरात तीन मिळून ‘डेंग्यू’चे सहा रुग्ण आढळून आले आहे. या बाहेरील केसी आहेत. नोकरी-व्यवसाय आणि अन्य कारणांमुळे डिचोलीबाहेर प्रवास ठिकाणी लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी दिली आहे.

पावसाळी आजार नियंत्रणात आणण्यासाठी डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असतानाच, ‘डेंग्यू’चे रुग्ण आढळून आल्याने जनतेमध्ये भीती पसरली आहे.

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या आजरांचा फैलाव होऊ नये. यासाठी आरोग्य केंद्रातर्फे आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. साळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

SCROLL FOR NEXT