Ravi Naik  Dainik Goamantak
गोवा

Bhausaheb Bandodkar यांनी सुरु केलेली साक्षरता मोहिम गोव्याच्या समृद्धतेसाठी आवश्‍यक- रवी नाईक

रवी नाईक : सुवर्णमहोत्‍सवी पुण्‍यतिथीनिमित्त बांदोडकरांना फर्मागुढीत आदरांजली

गोमन्तक डिजिटल टीम

Bhausaheb Bandodkar गोव्‍याचे भाग्‍यविधाते तथा पहिले मुख्‍यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोवा राज्याला साक्षर बनविण्‍यासाठी गावोगावी शाळा सुरू केल्‍या. त्‍यासाठी शिक्षकांची फौज तयार केली. त्‍यामुळेच आज गोवा राज्‍य पूर्णपणे साक्षर बनले.

ही साक्षरता गोव्याच्या आणि देशाच्या समृद्धतेसाठी उपयोगात आणणे आवश्‍यक आहे, असे उद्‌गार फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी काढले.

फर्मागुढी-फोंडा येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या सुवर्णमहोत्‍सवी पुण्‍यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नाईक बोलत होते. यावेळी फोंडा नगराध्य रितेश नाईक, नगरसेवक रुपक देसाई, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत नाईक व भाऊप्रेमींची मोठी उपस्थिती होती.

भाऊसाहेबांनी गोव्याच्या विकासाला पहिले प्राधान्य दिले. राज्यात आणलेले विविध विकासप्रकल्प ही त्याची साक्ष होय. औद्योगिक विकासाबरोबरच मानवी विकासासाठी त्यांनी उपक्रम

राबविले. शिक्षण हे महत्त्वाचे असल्‍याचे जाणून त्‍यांनी शाळा, विद्यालये सुरू केली. तसेच ग्रामीण भागातील लोकांना साक्षरतेसाठी उद्युक्त केले. त्‍यांनी गोव्याच्या विकासासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असेच आहे. आजचा समृद्ध गोवा हा भाऊसाहेबांच्या संकल्पनेतूनच साकारला गेला आहे, असे रवी नाईक म्‍हणाले.

यावेळी उपस्‍थित मान्‍यवरांनीही भाऊंच्‍या कार्याबद्दल विचार मांडले. तसेच त्‍यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍प वाहिले. यावेळी नागरिक आणि भाऊप्रेमींची मोठी उपस्‍थिती होती.

विकासाची पायाभरणी भाऊसाहेबांमुळेच : दीपक ढवळीकर

भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या समृद्धतेकडे लक्ष देताना मोठमोठे प्रकल्प राज्यात आणले. गोव्याच्या विकासाची खरी पायाभरणी ही त्‍यांनीच केली. म्हणूनच आज गोवा समृद्ध झाला, असे उद्‌गार माजी मंत्री तथा मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काढले.

फर्मागुढीत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, डॉ. केतन भाटीकर, दामोदर नाईक, प्रिया च्यारी, सरपंच सुखानंद कुर्पासकर, शैलेंद्र पणजीकर, इतर सरपंच व पंचसदस्य, मगो पक्षाचे युवा नेते मिथिल ढवळीकर आणि मगोचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भाऊंनी घेतले बहुजनांच्‍या हिताचे निर्णय : गोविंद गावडे

बराच काळ पिचत पडलेल्या बहुजन समाजाचे हिताचे निर्णय भाऊसाहेब बांदोडकर यांनी घेतले. त्यामुळे बहुजन समाज मान वर करून बोलू शकला. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. बहुजन समाजील लोक समाजातील लोकांचेच पाय ओढत आहेत, अशी खंत कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी व्‍यक्त केली.

फर्मागुढी येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विश्‍वास गावडे व मान्यवर मंडळी उपस्थित होती. गावडे म्हणाले की, भाऊसाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास केला.

अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामुळेच आज गोवा समृद्धतेच्या वाटेवर पोचू शकला. भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे गोवा शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात भरारी मारू शकला, असेही गावडे म्‍हणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT