Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: 'भाऊबीजेची ओवाळणी ठरली शेवटची'! गोव्यातून परत येताना दुचाकी झाडावर आदळली; 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sawantwadi Accident Death: गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून परतणाऱ्या वीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हसापूर मार्गावर घडली.

Sameer Panditrao

सावंतवाडी: गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून परतणाऱ्या वीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज हसापूर मार्गावर घडली. विलवडे (ता. सावंतवाडी) येथील ऋषिकेश बापूजी दळवी (वय २०) हा आपल्या बहिणीकडे गोव्यातील हसापूर येथे भाऊबीजेसाठी गेला होता.

दुपारी झालेली ओवाळणी हीच त्याची शेवटची ठरली. सायंकाळी तो विलवडे येथे परत येत असताना मुसळधार पावसात रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी झाडावर आदळली.

या भीषण धडकेत ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मोपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) इस्पितळात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. तरुण ऋषिकेशच्या मृत्यूने विलवडे गावात शोककळा पसरली असून भाऊबीजेच्या दिवशीच घडलेले हे दुर्दैवी निधन हृदय पिळवटून टाकणारे ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT