Goa Bhandari Samaj Aam Sabha Dainik Gomantak
गोवा

Goa Bhandari Samaj Aam Sabha: भंडारी समाज आमसभेत प्रचंड गोंधळ; अध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार

अशोक नाईक यांच्यासह 12 सदस्यांनी अर्ध्यावर सोडली बैठक

दैनिक गोमन्तक

Goa Bhandari Samaj Aam Sabha: भंडारी समाजातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. या वादाचे पडसाद आज पाजीफोंड-मडगाव येथे झालेल्या आमसभेत उमटले. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यावर उपस्थित युवकांनी प्रश्नांचा भडिमार केला.

त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. अखेर नाईक यांच्यासह इतर सदस्यांनी ही बैठक अर्ध्यावर सोडली. त्यामुळे आमसभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

शुक्रवारी समाजाचे नेते उपेंद्र गावकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन विद्यमान समितीवर वि​विध आरोप केले होते. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनीही सोशल मीडियाद्वारे गावकर यांच्या आरोपांना उत्तर देत, त्यांच्यावर टीकाही केली होती.

उपेंद्र गावकर यांनी ‘भंडारी समाजाची समिती बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्ञाती बांधवांनी या आमसभेस उपस्थित राहू नये’, असे आवाहन पत्रकार परिषदेत केले होते. असे असतानाही रविवारच्या आमसभेत जवळपास 200 लोकांनी उपस्थिती लावली होती. ही उपस्थिती कमी असल्याने इतर सदस्यांमध्ये नाराजीही निर्माण झाली.

आमसभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातील महत्त्वाचा प्रश्न होता तो अध्यक्ष निवडीचा. ऑनलाईन पद्धतीने अध्यक्षांना कशी काय मुदतवाढ देण्यात आली, घटनेमध्ये असा कोणताही उल्लेख नसताना असा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न अशोक नाईक यांना विचारण्यात आला.

यावर नाईक यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये हमरीतुमरीची भाषाही करण्यात आली. वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नाईक यांनी अर्ध्यावर बैठक सोडली.

काय म्हणाले होते नाईक

उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ऑनलाईन पद्धतीने आमसभा घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आम्ही त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने आमसभा घेतली.

कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश आदींनीही ऑनलाईन पद्धतीने बैठका घेतल्या, मग त्यांनीही चूक केली का, असा सवाल अशोक नाईक यांनी केला होता. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

प्रश्नांच्या भडिमारामुळे सळो की पळो

गेल्या वर्षी ऑनलाईन आमसभा घेतली, त्यावेळी या सभेस एक हजारांवर अधिक बांधव उपस्थित होते, असे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले होते.

मात्र, त्यावेळी केवळ ७२ सभासदांची उपस्थिती होती, असे सचिव पणजीकर यांनी सांगताच उपस्थित बांधवांनी तो व्हिडिओ सर्व सभासदांना ऐकून दाखवला.

त्यांनी देवानंद नाईक यांची फजिती उडवली. तसेच ही समितीच नको, असा आक्रमक पवित्रा लोकांनी यावेळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT