Goa Bench of Mumbai High Court  Dainik Gomantak
गोवा

Panjim Fish Market: पुनवर्सन व पर्यायी व्यवस्थेचा उल्लेख का नाही? महानगरपालिकेची गोवा खंडपीठाकडून कानउघाडणी

Goa Bench: पणजीतील मासळी मार्केटच्या बाजूला असलेली इमारत धोकादायक ठरवून तळमजल्यावर असलेल्या मांस विक्रेत्यांची दुकाने सील करण्यात आली होती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी मासळी मार्केट इमारतीतील सील केलेल्या मांस विक्रेत्या दुकानधारकांना पर्यायी व्यवस्था काय केली आहे तसेच त्यांचे पुनवर्सन करणार की नाही? असा प्रश्‍न खंडपीठाने पणजी महापालिकेला केला आहे. दुकानदार हे भाडेकरू असले तरी ही इमारत पाडून नव्याने बांधकाम केल्यावर त्याना जागा देणार की नाही? हे अस्पष्टच आहे.

भाडेकरूच्या प्रश्‍नाबाबत खंडपीठ जाऊ इच्छित नाही, तर या विक्रेत्यांचा व्यवसायाचा हक्क हिरावून घेण्याचा महापालिकेला अधिकार नाही. ही दुकाने सील करताना महापालिकेने दिलेल्या आदेशात पुनवर्सन व पर्यायी व्यवस्थेचा कोठेच उल्लेख का नाही? अशी कानउघाडणी खंडपीठाने केली.

पणजीतील मासळी मार्केटच्या बाजूला असलेली इमारत धोकादायक ठरवून तळमजल्यावर असलेल्या मांस विक्रेत्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत. पणजी महापालिकेने या इमारतीच्या बांधकाम स्थिरतेबाबत दोन वेगवेगळे अहवाल सादर केले आहेत. त्यामुळे या इमारत बांधकामाच्या स्थिरतेबाबत गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत (जीईसी) तपासणी करून केव्हापर्यंत त्याचा अहवाल सादर करणे शक्य आहे. यासंदर्भातची माहिती देण्याचा तोंडी निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवास्थित खंडपीठाने विक्रेत्यांच्या याचिकेवरील सुनावणी (३ सप्टेंबर) ठेवली आहे.

काही दिवसांपूर्वी पणजी महापालिकेने मासळी मार्केटात असलेली इमारत धोकादायक असल्याचे नमूद करून सात मांस विक्रेत्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर हे सर्व दुकाने सील केली त्यामुळे या विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले आहे. गेल्यावर्षी महापालिकेने या इमारतीचा बांधकाम स्थिरता तपासणी सरकारी तंत्रनिकेतनकडून करून घेतली होती. या अहवालात या इमारतीचा तळमजला व पहिला मजला धोकादायक नसून त्याची डागडुजी करण्याची गरज आहे, असे अहवालात नमूद केले होते.

त्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना या इमारतीच्या धोकादायसंदर्भात पत्र पाठवून त्याची तपासणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तलाठीला त्याची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या तलाठीने दिलेल्या एकपानी अहवालात हे इमारत धोकादायक असून तेथे व्यवसाय करणाऱ्यांना तेथून हटवण्यात यावे अशी शिफारस केली होती. या शिफारशीनुसार महापालिकेने सात मांस विक्रेत्यांची दुकाने सील केली आहेत.

मांस विक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प

पणजी महापालिकेने मांस विक्रेत्यांची दुकाने सील केल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पणजी मार्केटमध्ये मांस विक्रीचे एकही दुकान सध्या नाही. या इमारतीच्या तळमजल्यावर काही मासे विक्रेते तसेच मासे कापून देणारे व्यावसायिकही आहे. त्यांना तेथून हटवण्यात आलेले नाही. महापालिकेने या दुकानधारकांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. ते भाडेकरू असल्याचे सांगून त्यांना पर्यायी जागा देण्यास तयार नाही. नव्याने इमारत बांधणार की नाही व बांधल्यास याचिकादार असलेल्या विक्रेत्यांना जागा देणार की नाही याचेही स्पष्टीकरण नाही अशी बाजू याचिकादाराच्या वकिलांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT