caculo mall to stp tonca road  Dainik Gomantak
गोवा

Goa Bench: काकुलो मॉल ते टोंक एसटीपी पर्यंतचा रस्ता कधी होणार? सविस्तर माहिती देण्याचे खंडपीठाचे निर्देश

Panaji Smart City: कामे पूर्ण करण्यासाठी दिलेला वेळ तसेच अंतिम मुदत याची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने आज सरकारला दिले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City

पणजी: काकुलो मॉल ते टोंक येथील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पर्यंतच्या स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम केव्हापर्यंत पूर्ण होईल व कंत्राटदारांसोबत केलेल्या करारानुसार सर्व कामे पूर्ण करण्यासाठी दिलेला वेळ तसेच अंतिम मुदत याची सविस्तर माहिती उद्या २१ ऑगस्टपर्यंत देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज सरकारला दिले.

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामासंदर्भातील जनहित याचिका गोवा खंडपीठासमोर आज सुनावणीस आल्या. सध्या पणजी शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कोणतेही काम सुरू नाही. काही किरकोळ कामेही बंद आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सरकारने ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील, असे सांगितले होते. त्यानंतर मुदत वाढवून घेतली तरी ती झालेली नाहीत, अशी बाजू याचिकारादांच्या वकिलांनी मांडली.

पदपथाच्या कामात अडथळे येत आहेत. सांतिनेझ येथील विवांता ताज हॉटेलसमोर एक ‘क्रॉस’ आहे. यामुळे तेथील पदपथाचे काम अडले आहे. या क्रॉसच्या शेजारी राहत असलेल्या काही कुटुंबांनी हरकत घेतली आहे. त्यावर तोडग्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर काही भागात घरांसमोर असलेल्या पदपथावर हक्काचा दावा काही कुटुंबांनी केला आहे. ही जागा सरकारी आहे. त्यामुळे मामलेदारांनी पदपथावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला काहींनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिले आहे. ही सुनावणी लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती एजी पांगम यांनी खंडपीठाला दिली.

३१ मेपर्यंत काम पूर्ण होईल म्हटलेच नव्हते!

याचिकादारांच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे खोडून काढताना एजी देविदास पांगम यांनी स्पष्ट केले की, ३१ मेपर्यंत रस्ते वाहतुकीस खुले केले जातील, असे आश्‍वासन दिले होते. या तारखेपर्यंत रस्त्यांचे काम पूर्ण होईल, असे कधीच म्हटले नव्हते. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे पूर्ण करण्यास मार्च २०२५ पर्यंत मुदत आहे.

ही कामे वेगवेगळ्या कंत्राटदारांमार्फत सुरू आहेत. रस्ते, पदपथ तसेच मलनिस्सारणच्या कामांसाठी वेगवेगळे कंत्राटदार आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येत आहेत. पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल.

पावसाळ्यापूर्वी हे डांबरीकरण केले असते तर पावसात धुपून गेले असते. याचिकादाराने छायाचित्रांद्वारे जे खड्डे तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशा निदर्शनास आणून दिली आहे, त्यासंदर्भात तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT